शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य संकटात असताना मुख्यमंत्री घरात; राष्ट्रपती राजवट लागू करा- खासदार नवनीत राणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 19:51 IST

खासदार नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका; शरद पवारांच्या दौऱ्याचं कौतुक

नवी दिल्ली: राज्यातील कोरोना संकट हाताबाहेर गेलं आहे. त्यामुळे केंद्राकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार असल्याचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी सांगितलं. राज्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातच बसून आहेत. ते मातोश्रीतून बाहेर पडायला तयार नाहीत. इतर मुख्यमंत्री जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत असताना उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानाबाहेर निघत नाहीत. त्यामुळेच राज्यातील परिस्थिती भीषण झाल्याचं त्या म्हणाल्या.तरुणांनो, लागा तयारीला! ठाकरे सरकार पोलीस खात्यातील साडे बारा हजार पदं भरणारपंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील कोरोना संकटात बाहेर पडत नसल्याचं काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही राणा यांनी भाष्य केलं. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल वेगळा असतो. इतर राज्यांचे मुख्यमंत्री जिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आरोग्य व्यवस्था उत्तम राखण्यासाठी बैठका घेत आहेत. मात्र उद्धव ठाकरे घरातच बसले आहेत. ते मातोश्रीबाहेर पडत नाहीत, अशी टीका राणा यांनी केली. मंत्री बच्चू कडूंनी उडवली कंगना राणौतची खिल्ली; “ग्रामपंचायत निवडणुकीत उभी राहिली तरी...”राज्यातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी लोकसभेत करणार आहे. राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा ताबा केंद्रानं घ्यावा. त्याशिवाय स्थिती सुधारणार नाही, असं त्या पुढे म्हणाल्या. उद्धव यांच्यावर टीका करताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला. शरद पवार एका पक्षाचे प्रमुख आहेत. ते ८० वर्षांचे आहेत. मात्र या परिस्थितीतही ते राज्यभर फिरतात. विविध जिल्ह्यांचा आढावा घेतात, असं राणा यांनी म्हटलं.सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रगचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार रडारवर आहेत. यावरून लोकसभेतही वादळी चर्चा सुरू आहे. त्यावर राणा यांनी भाष्य केलं. 'संपूर्ण इंडस्ट्री तशी नाही, याची मला जाण आहे. मीदेखील इंडस्ट्रीत काम केलं आहे. पण अनेक मोठ्या कुटुंबातील कलाकार ड्रग्ज घेतात. काही वर्षांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात क्रिकेटपटूंची नावंदेखील यामध्ये समोर आली होती. त्यामुळे काहींवर आजीवन बंदी घातली गेली,' असं राणा म्हणाल्या.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेnavneet kaur ranaनवनीत कौर राणा