शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal: कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आता PM मोदींऐवजी CM ममता बनर्जींचा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 18:53 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यातील राजकीय द्वंद्व काही थांबताना दिसत नाही.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यातील राजकीय द्वंद्व काही थांबताना दिसत नाही. कोरोनाची लस घेतल्यानंतर आतापर्यंत लस घेतलेल्या व्यक्तीला उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापला जात होता. पण आता पश्चिम बंगालमध्ये लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रकावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

ममता बॅनर्जी याआधीपासूनच केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर सवाल उपस्थित करत आल्या आहेत. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा मुद्दा त्यांनी वारंवार उपस्थित केला आहे. यातच ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व मुख्य मंदिरातील पुजाऱ्यांना कोरोना विरोधी लस देण्याचे आदेश दिले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार आता तिसऱ्या टप्प्यात कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रकावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्यात येणार आहे.

मोदींच्या फोटोबाबत केली होती तक्रारविधानसभा निवडणुकीवेळी तृणमूल काँग्रेसनं कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापला जात असल्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापला जाणं हे निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचं भंग असल्याचा आरोप तृणमूलनं केला होता. 

पश्चिम बंगाल सरकारकडून मोफत लसीकरणपश्चिम बंगालमधील जनतेला मोफत लसीकरण केलं जात आहे. प्रत्येक लसीसाठी सरकारचा ६०० ते १२०० रुपयांचा खर्च होत आहे. राज्यात आतापर्यंत १.४ कोटी जनतेचं लसीकरण झालं आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लस