शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

West Bengal Election : "पश्चिम बंगालच्या लोकांना उत्तम प्रशासन हवं; सत्तेत आल्यास घुसखोरी, तस्करी, हिंसाचाराला लगाम घालणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 19:15 IST

West Bengal Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅलीद्वारे साधला जनतेशी संवाद

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅलीद्वारे साधला जनतेशी संवादकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकांमुळे रॅली केल्या होत्या रद्द

सध्या देशात कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तसंच उच्चस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला. दरम्यान, आपण त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही याबाबत त्यांनी लोकांसमोर खंत व्यक्त केली. "सकाळपासूनच मी अनेक बैठकांमध्ये व्यग्र होतो. कोरोनाच्या कारणामुळे मी तुमच्यापर्यंत थेट पोहोचू शकलो नाही याचं मला दु:ख आहे. परंतु या ठिकाणी फार कमी लोकं आहेत. सर्वांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले आहेत. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं आहे," असं मोदी यावेळी म्हणाले. "भाजपचं डबल इंजिन सरकार बंगालच्या विकासात कोणतीही कसर राहू देणार नाही. बंगालच्या लोकांना उत्तम शासन हवं आहे. सत्तेत आल्यास घुसखोरी, तस्करी आणि हिंसाचारावर लगाम घातला जाईल. बंगालच्या लोकांना भ्रष्टाचारमुक्त सरकार दिलं जाईल," असं मोदी यावेळी म्हणाले. "बंगालची जनता चांगल्या प्रशासनासाठी मतदान करत आहे. बंगालमधील जनता शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी आग्रही आहे," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता दक्षिण येथील आपल्या रॅली रद्द केल्या होत्या.

ममता बॅनर्जींनी साधला होता मोदींवर निशाणाकोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हे पंतप्रधान मोदीनिर्मित संकट असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रचारसभेदरम्यान त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. सात महिन्यांअगोदर केंद्राने म्हटले होते की, कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. एकीकडे देशात लसी, ऑक्सिजनची कमतरता आहे. दुसरीकडे लसी व औषधे बाहेरील देशांत पाठविली जात आहेत. निवडणुकीत भाजप दुसऱ्या राज्यांतून लोक बंगालमध्ये आणत आहे आणि त्यामुळे संसर्ग वेगाने पसरत आहे. म्हणून याला पंतप्रधाननिर्मित संकटच म्हणावे लागेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, डावे पक्ष व आयएसएफच्या आघाडीला मतं देणे म्हणजे भाजपला आणखी मजबूत करण्यासारखे आहे, असा दावादेखील त्यांनी केला होता.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याMamata Banerjeeममता बॅनर्जीAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021