शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्हालाही मोदींचीच कोरोना लस घ्यावी लागेल; त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे लोकशाहीच्या विरोधात बोलणं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 18:23 IST

West Bengal Election 2021: आम्हाला मोदींचं तोंडही पाहायचं नसल्याचं यापूर्वी म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी

ठळक मुद्देआम्हाला मोदींचं तोंडही पाहायचं नसल्याचं यापूर्वी म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जीभाजप नेत्यानंही साधला ममता बॅनर्जींवर निशाणा

आता लवकरच पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडणार आहे. सध्या भाजप आणि तृणमूल काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेसकडून पंतप्रधाननरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपकडून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला जात आहे. यापूर्वी पूर्व मदिनापूर येथे झालेल्या रॅलीत ममता बॅनर्जींनी आक्रमक होत आपल्याला नरेंद्र मोदींचं तोंडही पाहायचं नसल्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर तृणमूल काँग्रेसमधूनच भाजपत सामील झालेल्या एका नेत्यानं ममता बॅनर्जींवर निशाणा साधत मोदींविरोधात बोलणं म्हणजे लोकशाही विरोधात बोलणं असल्याचं म्हटलं. "तुम्हाला पंतप्रधान मोदींचीच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी लागणार आहे. ते निवडून आलेले पंतप्रधान आहेत. त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे लोकशाहीच्या विरोधात बोलणं. त्यांच्याविरोधात बोलणं म्हणजे भारत मातेच्या विरोधात बोलणं. पाकिस्तान आणि बांगलादेशकडे लस नाही, त्यामुळे तुम्हाला मोदींचीच लस घ्यावी लागेल," असं म्हणत सुवेंदु अधिकारी यांनी जोरदार निशाणा साधला.काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी?काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांनी पायाला प्लॅस्टर असल्यामुळे व्हिलचेअरवरून प्रचार करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी पूर्व मदिनापूर येखे शुक्रवारी एका रॅलीला संबोधित केलं. "भाजपला निरोप द्या. आपल्याला भाजप नकोय. आम्हाला मोदींचा चेहराही पाहायचा नाही. आपल्याला हिंसाचार, लुटारू, दुर्योधन, दुशासन, मीर जाफर नकोयत," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीCorona vaccineकोरोनाची लस