शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

"जामिनावर सुटला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल", चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 17:00 IST

पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर बोलत असताना राज्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना रोखठोक इशारा दिला आहे. 

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. यातील पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं होतं. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी भाजपचं आव्हान फोडून काढत पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश प्राप्त केल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. याच निकालावर बोलत असताना राज्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना रोखठोक इशारा दिला आहे. 

छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया दिली होती. यात भुजबळ यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. "बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जवळपास दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे ८ ते १० मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही. देशात आता भाजपविरोधी लाट तयार झाली आहे", असा टोला भुजबळ यांनी लगावला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना थेट इशाराच दिला आहे. 

"छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला", असं चंद्रकात पाटील म्हणाले. "पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या तर ईव्हीएम बरोबर आहे आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चूक आहे असं कसं होऊ शकतं.

बंगालमधील पराभवाचं दु:ख तर वाटणारच. आम्ही कुठलीही गोष्ट कार्यकर्ते म्हणून करत असतो. आम्ही निवडणुका फार गांभिर्याने घेतो आणि पराभव जरी झाला असला तरी भाजप विरोधात सगळे एकत्र आले होते हे लक्षात घ्यायला हवं. वर्षानुवर्षे तिथं सरकारमध्ये असलेले नाही च्या बरोबरीने दिसत आहेत", असंही चंद्रकांत पाटील म्हणाले

काय म्हणाले होते भुजबळ?पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'मेरा बंगाल नहीं दूंगी म्हणत ममता बॅनर्जी झाशीच्या राणीसारख्या लढल्या. आता देशात भाजपविरोधी लाट तयार झालीय', असं छगन भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

"ममता बॅनर्जी या झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या आणि मैं अपनी झाशी नही दुंगी असं झाशीच्या राणी म्हणाळ्या होत्या. त्याचप्रमाणे ममता दीदी देखील मैं अपना बंगाल नहीं दुंगी म्हणत लढल्या. बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जवळपास दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे ८ ते १० मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही", असा टोला छगन भुजबळ यांनी भाजपला लागवला होता. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Chagan Bhujbalछगन भुजबळ