शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामाचे नाव आम्ही कोणावरही थोपविलेले नाही;पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 08:18 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ : पर्यटन आणि मंदिरांसह लगतच्या परिसरातील पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यावर उत्तर प्रदेश प्रशासन भर देत असल्याचे यावेळी प्रशासनाने नमूद केले.

सचिन लुंगसे लखनऊ : पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामधील शाब्दिक संघर्ष टोकाला गेला असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. आम्ही रामाचे नाव कोणावरही थोपविले नाही. थोपविणार नाही, असे ते म्हणाले. भाजपवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२४ जानेवारी, उत्तर प्रदेश दिनानिमित्त लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी मुंबई, दिल्ली, कोलकातास्थित पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कित्येक वर्षांपासून सुरू असलेला अयोध्या वाद संपला आहे. अयोध्या बदलत आहे. उत्तर प्रदेश बदलत आहे. पायाभूत सेवा सुविधा विकसित होत आहेत. आम्ही पूर्वांचल एक्स्प्रेस हायवेसारखा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. एकूण चार एक्स्प्रेस हायवे बांधले जात आहेत. यामुळे येथे औद्योगिक क्षेत्र विकसित होईल. व्यापार आणि रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. स्थानीक गुंतवणूक तसेच परदेशी गुंतवणूक व्हावी म्हणून काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आहे. आम्ही चार वर्षे वादाशिवाय पूर्ण केली. केंद्र, राज्याच्या योजना लोकांपर्यंत पाेहाेचत आहेत. दारूमुक्त उत्तर प्रदेशसाठी, शेतकरी प्रश्न सोडण्यासाठी काम करत आहोत, असे ते  म्हणाले. उत्तर प्रदेशमधील नागरिकांना येथे रोजगार मिळावा म्हणून काम केले जात असून, येथील ७५ जिल्ह्यांतून ७५ प्रकारच्या उत्त्पादनांना बाजारपेठ देण्यासाठी उत्तर प्रदेश दिनासह विविध कार्यक्रमातून प्रयत्न केले जात आहेत. येथील पर्यटन आणि मंदिरांसह लगतच्या परिसरातील पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यावर उत्तर प्रदेश प्रशासन भर देत असल्याचे यावेळी प्रशासनाने नमूद केले.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालyogi adityanathयोगी आदित्यनाथ