शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

शशिकला यांचा राजकारणातून संन्यास, निवडणुकीपूर्वी तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 07:49 IST

Tamilnadu Assembly Election 2021: शशिकला यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे निवडणुकीआधीच मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देशशिकला यांना २०१७ साली ६६ कोटींच्या बेहिशोबी संपत्ती प्रकरणात चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

चेन्नई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय आणि एआयएडीएमके (AIADMK) च्या नेत्या व्हीके शशिकला यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शशिकला यांनी तुरुंगातून शिक्षा भोगून आल्यानंतर काही दिवसांतच हा निर्णय घेतला आहे. तर शशिकला या आगामी विधानसभा निवडणूक लढतील, असे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा भाचा टीटीव्ही दिनाकरण यांनी सांगितले होते. (vk sasikala announces to quit politics urges aiadmk to stay united and fight dmk)

शशिकला यांनी याबाबत एक निवेदन जारी केले असून आपल्या समर्थकांना आणि एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आणि डीएमके पक्षाला पराभूत करण्याचे आवाहन केले आहे.  त्या म्हणाल्या, "तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेचे सरकार बनावे म्हणून मी राजकारणातून संन्यास घेत आहे. मी पक्षाच्या विजयासाठी देवाकडे आणि माझी बहिण जयललिता यांच्याकडे प्रार्थना करते. मी नेहमीच तामिळनाडूच्या जनतेच्या भल्यासाठी काम करत राहणार आणि जयललिता यांच्या मार्गावर जाणार आहे. एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांनी एकजूट राहावे आणि डीएमकेला निवडणुकीत पराभूत करावे."

दरम्यान, तामिळनाडूत आगामी विधानसभा निवडणूकीत माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी यांची उणीव भासणार आहे. तसेच, सुपरस्टार रजनीकांत यांची राजकारणातील माघार, अभिनेते कमल हसन यांची राजकारणातील एन्ट्री तसेच भाजपची एआयएडीएमके सोबत झालेली युती या पार्श्वभूमीवर तामिळनाडूची निवडणूक अत्यंत रंगदार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातच, आता शशिकला यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे निवडणुकीआधीच मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

चार वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर शशिकला यांची तुरुंगातून सुटकाशशिकला यांना २०१७ साली ६६ कोटींच्या बेहिशोबी संपत्ती प्रकरणात चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. २७ जानेवारी २०२१ रोजी शशिकला या चार वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून आल्या आहेत. त्यांच्यावर ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा आरोप होता. शशिकला यांच्या जवळचे समजले जाणारे नातेवाईक जे इलावारसी तसंच जयललिता यांचा मानलेला मुलगा व्ही एन सुधाकरण यांनाही या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली होती.

तामिळनाडूत एकाच टप्प्यात मतदानतामिळनाडूत 234  जागांसाठी एक टप्प्यात मतदान होणार आहे. तामिळनाडूत 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहेत.

टॅग्स :V. K. Shashikalaव्ही. के. शशिकलाTamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Tamilnaduतामिळनाडू