शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उर्मिला मातोंडकर यांनी हाती बांधले शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

By बाळकृष्ण परब | Updated: December 1, 2020 14:07 IST

Urmila Matondkar joined Shiv Sena : उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधत अधिकृतरीत्या शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई - गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चेंनंतर प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर आज आपल्या हाती शिवबंधन बांधले. उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधत अधिकृतरीत्या शिवसेनेत प्रवेश केला.राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नावाची शिफारस करण्यात आल्यापासून उर्मिला मातोंडकर ह्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्या चर्चेला शिवसेनेतील काही वरिष्ठ नेत्यांनीही दुजोरा दिला होता. तसेच उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने शिवसेनेची महिला आघाडी भक्कम होणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. 

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूकही लढवली होती. त्यावेळी गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्या काही काळ राजकारणापासून दूर होत्या.  विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा विषय चर्चेत आल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांचे नाव चर्चेत आले होते. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे तसेच उर्मिला मातोंडकर यांनीही हा प्रस्ताव स्वीकारल्याचे सांगण्यात येत होते.

 

 दरम्यान, उर्मिला मातोंडकर या आज संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. तुम्ही सर्वजण देत असलेल्या पाठिंब्याबाबत आभार. मी मंगळवारी संध्याकाळी चार वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे. कृपया कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहा, जय महाराष्ट्र, असे आवाहन उर्मिला मातोंडकर यांनी काल केले होते. 

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMumbaiमुंबई