शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये अस्वस्थता! राहुल गांधींनी अध्यक्षपद सांभाळावे; अन्यथा हस्तक्षेप बंद करावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:31 IST

राजकारणात अद्याप परिपक्व नसणाऱ्या लोकांचा सल्ला राहुल गांधी घेतात, यावरून नेत्यांचा मोठा गट नाराज आहे.

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावर अस्वस्थता व मतभेद आहेत आणि याचमुळे काँग्रेसची शनिवारी होणारी कार्य समितीची बैठक होऊ शकली नाही. ही विस्तृत बैठक बोलवावी, असे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे मत होते, तर विस्तृत बैठक होऊ नये, असे उर्वरित बड्या नेत्यांचे मत होते. त्यामुळे अखेर ही बैठक रद्द करण्यात आली.

पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. राहुल गांधी यांनी एक तर पुढे येऊन अध्यक्षपद सांभाळावे किंवा पक्षाच्या निर्णयांना प्रभावित करणे सोडावे, असे नेत्यांच्या एका गटाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना स्पष्टपणे सांगितलेले आहे.राहुल गांधी यांना अध्यक्षपद देण्याबाबत नेत्यांत कोणतेही मतभेद नाहीत; परंतु त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी समोर यावे व थेट सर्व जबाबदारी स्वीकारावी. नेतृत्वाअभावी पक्ष आपले अस्तित्व गमावत आहे व केवळ फेसबुक- ट्विटरवर ते टिकून आहे.

फेसबुक-ट्विटरच्या आधारे राजकारण शक्य नाही. पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी ठोस कार्यक्रम घेऊन मैदानात उतरावे लागेल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. अहमद पटेल, पी. चिदम्बरम, कपिल सिब्बल, दिग्विजय सिंह, कमलनाथ, अमरिंदर सिंह, शशी थरूर, मनीष तिवारी आदी नेत्यांचे वरीलप्रमाणे मत आहे. १५ ऑगस्ट रोजी काँग्रेस मुख्यालयात सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीला पक्षातील अस्वस्थतेला जोडले जात आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी राजी करावे. ते तयार होत नसतील, तर पक्षात सामूहिक नेतृत्वाची व्यवस्था करावी.नाराजी का?राजकारणात अद्याप परिपक्व नसणाऱ्या लोकांचा सल्ला राहुल गांधी घेतात, यावरून नेत्यांचा मोठा गट नाराज आहे. यात रणदीप सुरजेवाला, के.सी. वेणुगोपाल, शेरगिल, अशा युवा नेत्यांचे नाव आहे. सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे यांनी ज्या प्रकारची पावले उचलली, त्यासाठीही राहुल गांधी यांच्या आजूबाजूच्या नेत्यांना जबाबदार मानले जाते.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण