शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

माझ्या मुलांसह इतरांच्या मुलांचेही लाड करतो; उद्धव यांचा पवारांना टोला, आदित्यच्या उमेदवारीबाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 14:52 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर भाष्य केलं आहे.

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्यालोकसभा निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर भाष्य केलं आहे. आदित्य ठाकरे हे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. माझ्या मुलांबरोबर मी इतरांच्याही मुलांचे हट्ट पुरवतो, इतरांच्या पोरांचाही मी विचार करतो, दुसऱ्यांची पोरं धुणीभांडी करण्यासाठी वापरून घेत नाही. त्यामुळे शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच लवकरच लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सुजय विखे-पाटील मातोश्रीवर भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांकडून दगाफटका होणार नसल्याचंही मी सुजयला सांगितलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शरद पवार अष्टपैलू आहेत. पण भविष्य कधीपासून सांगायला लागले माहीत नाही. पवारसाहेब जे बोलतात त्याच्याविरुद्ध करतात, तर आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.  युवासेनेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणूक लढवायचीच असेल, तर त्यांनी ती ठाणे लोकसभा मतदारसंघातून लढवावी, अशी मागणी युवा सैनिकांनी पक्षनेतृत्वाकडे केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेसाठी सुरक्षित मतदारसंघ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पहिली सत्ता ठाण्याने मिळवून दिल्याने, ठाकरे कुटुंबातील एखादी व्यक्ती प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल, तर तिने ठाण्याचा विचार करावा, असे युवा सैनिकांचे म्हणणे होते.आदित्य हे लोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध होताच, ठाण्यातील युवा सैनिकांमध्ये चर्चेचा व औत्सुक्याचा विषय ठरला. सोशल मीडियावर युवा सैनिकांनी हे वृत्त शेअर केले. त्यातूनच आदित्य यांनी ठाण्यातून निवडणूक लढवावी, अशी मागणी पुढे आली. उत्तर-मध्य मतदारसंघातून आदित्य निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी वृत्तात दिली आहे, परंतु त्यापेक्षा ठाणे लोकसभा मतदारसंघ अधिक सुरक्षित आहे व ठाणेकरांचे सेनेवर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम असल्याने आदित्य यांनी येथून विजयश्री मिळवावी, असे युवा सैनिकांना वाटते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना