शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढल्यास सत्य समोर येईल : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 21:01 IST

Politics HasanMusrif Kolhapur : देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. जनगणनेचा अहवाल २०१४ पासून केंद्र सरकार देण्यास तयार नाही. त्यामुळेच आरक्षणाचे भिजत घोंगडे पडले असून या प्रकरणात नेमके कोणाची चुक आहे, हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर यायला हवी, यासाठी ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आपण संबंधित मंत्र्यांकडे केल्याची माहीती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढल्यास सत्य समोर येईल : मुश्रीफ फडणवीस यांच्या काळातच आरक्षणाचा बट्ट्याबोळ

कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. जनगणनेचा अहवाल २०१४ पासून केंद्र सरकार देण्यास तयार नाही. त्यामुळेच आरक्षणाचे भिजत घोंगडे पडले असून या प्रकरणात नेमके कोणाची चुक आहे, हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर यायला हवी, यासाठी ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आपण संबंधित मंत्र्यांकडे केल्याची माहीती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.मंत्री मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आम्ही नारायण राणे समिती नेमली ती आमची चूक होती. त्यानंतर १०२ घटना दुरुस्तीनंतर मराठा आरक्षणाचा राज्याला अधिकार नसताना ते देवेंद्र फडणवीस यांनी दिले, ही त्यांची चुकी होती. आता कोणाच्या चुका काढत बसण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोघांनी एकत्र आले पाहिजे. ओबीसी आरक्षणाचा तर खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच बट्ट्याबोळ झाला.

मंत्री छगन भुजबळ यांनी परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीत सगळा पर्दाफाश केला आहे. २०१० साली कृष्णमूर्तींच्या केसमध्ये ओबीसी आरक्षणाबाबतचा निकाल देण्यात आला. त्यानंतर २०११ ला जनगणना झाली आणि त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे असून २०१४ पासून हा अहवाल भाजप देण्यास तयार नाही. हा अहवाल नसल्याने आरक्षणाचा पेच निर्माण झाला. वास्तविक मागील पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे केले असते तर हा दिवस आला नसता. निति आयोग व जनगणना आयुक्त एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत, त्यामुळे एकदाची श्वेतपत्रिका काढावी, यामध्ये नेमके दोषी कोण आहेत, हे जनतेसमोर जाईल.

केंद्रीय तपास यंत्रणेबाबत आपण अनेक वेळा शंका व्यक्त केल्या आहेत. माजी पोलीस महासंचालकांनी एका वृत्तपत्रातील अग्रलेखातही सचिन वाझे व शर्मा हे कसे सेवेत आले, एकमेकांना कसे वाचवले, त्यांचे कारनाम्याबाबत उघड लिहिले आहे. अंबानीच्या घरासमोरील स्फोटके कोणी व कशासाठी ठेवली याचा लवकरात लवकर पर्दाफाश व्हायला हवा, अशी आपली मागणी असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.फडणवीसांनी पुणे मनपातील वाझे शोधावेतराज्य सरकारमधील प्रत्येक विभागात एक वाझे असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केल्याबद्दल विचारले असता, कदाचित फडणवीस यांना पंचांगवाल्यांनी सांगितले होते की काय हे माहिती नाही, मात्र ते तीन आठवड्यांनी बोलले. त्यांच्या ताब्यात असणाऱ्या पुणे महापालिकेत आंबिल ओढा येथील प्रकरण घडले. त्यामुळे फडणवीस यांनी अगोदर पुणे महापालिकेतील वाझे शोधावेत, मग इतर विभागाचकडे यावे, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.पडळकर अर्ध्या हळकुंडानी पिवळे होणारेआमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील टीकेबाबत विचारले असता, पडळकर हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे आहेत. त्यांच्या बोलण्याकडे कोणी गांभीर्याने पाहण्याची गरज नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफDevendradada Deshmukhदेवेंद्रदादा देशमुखkolhapurकोल्हापूर