शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
3
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
4
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
5
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
6
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
7
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
8
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
9
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
10
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
11
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
12
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
13
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
14
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
15
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
16
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
17
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
18
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
19
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
20
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका

लोकसभेसोबत विधानसभा नाहीच, मुख्यमंत्र्यांचा ठाम इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 6:21 AM

केंद्र सरकारने साखर कारखान्यांना दिलेले पॅकेज, यांमुळे महाराष्ट्रात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याच्या चर्चेला गुरुवारी उधाण आले.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले डझनभर निर्णय, नागपूर मेट्रोसह विविध कामांच्या उद्घाटनाची सुरू असलेली घाई व केंद्र सरकारने साखर कारखान्यांना दिलेले पॅकेज, यांमुळे महाराष्ट्रात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याच्या चर्चेला गुरुवारी उधाण आले. पण ‘लिहून घ्या, मुदतपूर्व निवडणूक होत नाही’ अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणूक लोकसभेसह घेण्याचा निर्णय दिल्लीत भाजपा नेत्यांच्या बैठकीत होणार आहे. महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाची शुक्रवारी जी बैठक होईत, तिच्यात विधानसभा बरखास्तीचा निर्णय घेतला जाईल, असे वृत्त पसरले. दिल्लीत तशी बैठक झाली नाही. मात्र शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घ्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती; पण भाजपाने ती अमान्य केली. एकत्रित निवडणूक घेतली तर भाजपामध्ये विधानसभेला मोठी बंडखोरी होईल, अशी शक्यता आहे. शिवसेनेच्या किमान ४० मतदारसंघांत भाजपाचे बंडखोर उभे ठाकतील, असे दिसते. त्यामुळेही भाजपाला एकत्रित निवडणूक नको असल्याचे कळते. दोन्ही निवडणुकांसाठी युतीत जागावाटप फॉर्म्युला ठरला असला तरी अनेकांना वाटते की ही युती विधानसभेपर्यंत टिकणार नाही. भाजपाचे १२२ आमदार असताना तो १४४ जागांवर समाधान कसे मानेल? चार अपक्ष आमदार भाजपातर्फे लढू इच्छितात. भाजपाला मित्रपक्षास दहा जागा द्याव्या लागतील. म्हणजे नव्याने लढण्यासाठी भाजपाकडे दहाही जागा शिल्लक नसतील.का नको मध्यावधी ?मुदतपूर्व निवडणूक घ्यायची तर राज्य सरकार अधिकारहीन होईल. हाती सत्ता असताना लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणे सोयीचे असते. आधी लोकसभा व नंतर विधानसभा निवडणूक घेतल्यास आमदारकीचे इच्छुक नेते लोकसभेसाठी ताकद लावतील. निवडणूक एकत्र झाल्यास नेते-कार्यकर्तेही विभागले जातात.राज्यात दुष्काळ असताना विधानसभेची निवडणूक सहा महिने आधी घेतल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. निवडणुकांची तयारी एक महिना आधी करून, निवडणूक आयोगाला कळवावे लागते. आता तेवढी वेळ नाही.>मुदतपूर्वचा प्रयोग अंगलटलोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचा प्रयोग १९९९ मध्ये युतीच्या अंगलट आला होता. सहा महिने आधी विधानसभा बरखास्त करून एकत्रित निवडणूक घेतली गेली. केंद्रात भाजपाची सत्ता आली, पण राज्यात ती गमवावी लागली होती.>लोकसभेसोबत महाराष्टÑ विधानसभेची निवडणूक होणार नाही. यासंदर्भातील चर्चा निराधार आहे. मुदतपूर्व निवडणूक होणारनाही हे लिहून घ्या. - देवेंद्र फडणवीस

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९vidhan sabhaविधानसभा