शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

"दहशतवादाला सीमा नाही, सर्व देशांनी एकत्रित लढा देण्याची गरज"

By मुरलीधर भवार | Updated: June 3, 2025 18:18 IST

Srikant Shinde: डॉ. श्रीकांत शिंदे यांचे लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेत सडेतोड भाषण

मुरलीधर भवार, कल्याण: दहशतवाद सीमा ओलांडून पसरला आहे. भारताने सुरु केलेल्या दहशतवाद विरोधी मोहीमेत आता जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आलीय, असे सडेतोड मत भारतीय खासदांच्या शिष्टमंडळाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेला संबोधित करताना खासदार शिंदे यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिका परखडपणे मांडली. या दौऱ्याच्या निमित्ताने सिएरा लिओन आणि लायबेरिया प्रजासत्ताक या पश्चिम आफ्रिकेतील दोन देशांच्या संसदेला संबोधित करण्याचा बहुमान मिळवणारे खासदार शिंदे हे एकमेव भारतीय खासदार ठरले आहेत.

खासदार शिंदे म्हणाले की, भारत मागील काही काळापासून दहशतवादी हल्ल्यांनी आणि सीमापार दहशतवादाने त्रस्त आहे. या छुप्या दहशतवादाची वस्तुस्थिती सांगण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय खासदार येथे आलो आहोत. सर्व राष्ट्रांना दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत भारतासोबत उभे राहण्याची विनंती करत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जागतिक पातळीवर दहशतवादविरोधी शून्य सहिष्णुता राबवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे खासदार शिंदे म्हणाले.

लायबेरिया प्रजासत्ताक संसदेचे सभापती रिचर्ड नाग्बे कून आणि उपसभापती थॉमस पी. फल्लाह यांनी भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केले. सिनेटचे अध्यक्ष न्यूब्ली कारंगा लॉरेन्स यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिंदे म्हणाले की, पाकिस्तानला बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) अर्थसहाय्य मिळत आहे. पाकिस्तानला ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येही टाकण्यात आले होते. मात्र सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये फोफावतात, त्यांना पाकिस्तानकडून पाठिंबा आणि प्रायोजित केले जाते. त्यामुळे यावेळीही भारताने पाकिस्तानचा ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्ये समावेश करावा, अशी मागणी केल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, लायबेरियाच्या कठिण काळात भारताने नेहमीच सोबत केली. दोन्ही देशांचे खास संबंध आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य बनणाऱ्या लायबेरियाकडून दहशतवादाविरोधात आवाज उठवला जाईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

शिंदे आणि शिष्टमंडळाने सोमवारी लायबेरिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष जोसेफ न्युमा बोकाई तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्री साराह बेस्लो न्यान्ती यांच्याशी चर्चा केली. भारताच्या दहशतवाद विरोधी मोहीमाला लायबेरिया प्रजासत्ताकने भक्कम पाठिंबा दर्शवला असल्याचे शिंदे म्हणाले. लायबेरिया प्रजासत्ताक संसदेचे सभापती रिचर्ड नाग्बे कून म्हणाले की, दहशतवादाशी सामना करण्यासाठी पश्चिम आफ्रिकेतील चार देशांची एकजूट महत्वाची आहे. सिनेट वरिष्ठ सभागृहाचे प्रो-टेम्पोर अध्यक्ष न्योनब्ली करंगा-लॉरेन्स यांच्या आदेशाने यावेळी लायबेरियाच्या संसदेत पहलगाम हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना दोन मिनिटं मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

चौकट -लायबेरिया प्रजासत्ताकमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे जंगी स्वागतभारताने हाती घेतलेल्या दहशतवादविरोधी मोहीमेला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनुसार शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात हे शिष्टमंडळ लायबेरिया प्रजासत्ताकची राजधानी मोनरोव्हियामध्ये रविवारी दाखल झाले. लायबेरिया सरकारच्या वतीने भारतीय शिष्टमंडळाचे जंगी स्वागत करण्यात आले. शिंदे आणि शिष्टमंडळाने मोनरोव्हियामधील गुरुद्वाराला भेट दिली. तसेच लायबेरियातील भारतीय समुदायाला शिंदे यांनी संबोधित केले. भारताच्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी आभार मानले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण