शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सपा-बसपा महागठबंधनला पवारांचा बिनशर्त पाठिंबा, काँग्रेसच्या अडचणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 19:57 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशात राजकीय नेते रॅली आणि सभा घेऊन एकमेकांवर शरसंधान साधत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील चाणक्य नेते असलेल्या शरद पवारांनी सपा-बसपा महागठबंधनच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल यांच्या महागठबंधनच्या सर्व उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हा आणि शहर कमिटीच्या संसदीय क्षेत्रातील महागठबंधनच्या उमेदवारांना महागठबंधनच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्याचे आदेशही दिले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या घोडदौडीला लगाम घालण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सर्व मतभेद विसरून महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, महाआघाडीची घोषणा होऊन महिना उलटला तरी दोन्ही पक्षांमधील जागावाटपाची घोषणा झाली नव्हती. अखेर आज सपा आणि बसपामधील जागावाटप जाहीर झाले आहे. या जागावाटपानुसार बसपा 38 तर सपा 37  जागांवर लढणार असून, उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

सपा आणि बसपामध्ये ठरलेल्या जागावाटपाच्या सूत्रानुसार दोन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशमधील 80 जागांपैकी काही जागा मित्रपक्षांना सोडून उर्वरित जागांचे आपसात वाटप केले आहे. त्यानुसार सपा 37 तर बसपा 38 जागांवर लढेल.  सपा-बसपा महाआघाडीने अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेसला सोडल्या आहेत. तर मथुरा, बागपत आणि मुझफ्फरनगरच्या जागा राष्ट्रीय लोकदल पक्षाला देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारmayawatiमायावतीAkhilesh Yadavअखिलेश यादवLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019