शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

“...तेव्हा शिवसेनेची ऑफर नाकारली अन् भाजपात थांबलो, अखेर देवेंद्र फडणवीसांनी न्याय दिला”

By प्रविण मरगळे | Updated: November 9, 2020 17:48 IST

Pune Graduate Constituency Election, BJP Sangram Deshmukh, Shiv Sena News: भाजपाने मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करत संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली.

ठळक मुद्देमागील विधानसभा निवडणुकीत पलूस-कडेगाव हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला गेला होताया मतदारसंघात देशमुख कुटुंबांचे मोठं वर्चस्व आहे. परंतु युती धर्म पाळला होतादेवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला न्याय दिला आहे

प्रविण मरगळे

मुंबई – विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होणार आहे, यात पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाने सांगलीच्या संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुणे पदवीधर निवडणुकीसाठी भाजपाच्या अनेक इच्छुकांनी प्रयत्न केले होते, पुण्याचे महापौर मुरळीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे यांनी भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते.

त्याचसोबत विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूड मतदारसंघ सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांना पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संधी दिली जाईल अशी चर्चा रंगली होती, परंतु भाजपाने मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करत संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांचा जिल्ह्यात मोठा प्रभाव आहे. सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यात त्यांचा कनेक्ट आहे. आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे ते बंधू आहेत.

या निवडीबाबत बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीत पलूस-कडेगाव हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला गेला होता, याठिकाणी देशमुख कुटुंबांचे मोठं वर्चस्व आहे. सध्या विद्यमान आमदार विश्वजित कदम यांना कडवी झुंज दिली असती, भाजपाने हा मतदारसंघ घेण्यासाठी प्रयत्न केले परंतु शिवसेनेने आमच्याकडे या आणि निवडणूक लढवा अशी आमंत्रण दिलं, परंतु भाजपा सोडायची नाही असं आम्ही ठरवलं, त्याचा फळ आता आम्हाला मिळालं आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत निश्चित पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाने मतदारांच्या नोंदणी केल्या आहेत, या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपाकडे राहिलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला न्याय दिला आहे भाजपाने दिलेल्या संधीचे नक्कीच सोनं करणार असा विश्वास सांगली जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

एकाच जिल्ह्यात दोघांना उमेदवारी?

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादीत काट्याची लढत शक्य आहे. भाजपाने सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही याच जिल्ह्यातील अरुण लाड यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे पदवीधर निवडणुकीच्या राजकारणाच सांगली जिल्हा हे केंद्र बनणार आहे.

आमदारकीची परंपरा

दिवंगत माजी आमदार संपतराव देशमुख यांनी १९९५ मध्ये पतंगराव कदम यांचा पराभव करून आमदारकी मिळवली होती. संपतराव देशमुख यांच्या पश्चात त्यांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख यांनी पतंगराव कदम यांच्याविरोधात विधानसभा पोटनिवडणूक जिंकली होती. त्यांनतर पृथ्वीराज देशमुख यांना भाजपच्या सत्ताकाळात मध्ये विधानपरिषदेवर संधी मिळाली होती. आता आणखी एकदा उमेदवारी मिळाल्याने देशमुख समथर्कांतून आनंद व्यक्त होत आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक