शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

Sharad Pawar : "बरेच काही बोलून काहीही न सांगणे हे शरद पवारांचे वैशिष्ट्य, आजही…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 17:26 IST

Sharad Pawar on Letter Bomb: परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या गंभीर आरोपामुळे निर्माण झालेली परिस्थिती सावरण्यासाठी स्वत: शरद पवार यांना पुढाकार घ्यावा लागला आहे.

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला मोठे हादरे बसले आहेत. (Sharad Pawar on Anil Deshmukh) परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या गंभीर आरोपामुळे निर्माण झालेली परिस्थिती सावरण्यासाठी स्वत: शरद पवार यांना पुढाकार घ्यावा लागला आहे. शरद पवार यांनी आज दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावर पक्षाची भूमिका मांडली. (Sharad Pawar on MVA Govt Future) मात्र शरद पवार यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेवरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांना खोचक टोला लगावला आहे.  (Atul Bhatkhalkar Says,  "Sharad Pawar's characteristic is not to say anything after saying a lot. Today's press conference was the same")

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शरद पवार यांनी आज  पत्रकार परिषदेत केलेल्या विधानांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, बरेच काही बोलून काहीही न सांगणे हे शरद पवारांचे वैशिष्ट्य आहे. आजची पत्रकार परिषदही तशीच होती. चौकशा कसल्या करताय, हकालपट्टी करा अनिल देशमुखांची, अशी मागणी यावेळी अतुल भातखळकर यांनी केली. 

दरम्यान, आज दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवर प्रथमच भाष्य केले. ते म्हणाले की, देताना शरद पवार म्हणाले की, परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर पत्राच्या माध्यमातून केलेले आरोप गंभीर आहेत. मात्र याबाबत अनिल देशमुख यांचीही बाजू जाणून घेतली पाहिजे. त्यांच्या राजीनाम्याबाबत आम्ही सर्वांशी बोलून निर्णय घेऊ. याबाबतचा निर्णय हा उद्यापर्यंत होऊ शकेल. असे असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील.  

दरम्यान, परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांबाबत परमबीर सिंह म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केलेले आहे. हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. परमबीर सिंह यांचे हे पत्र दोन भागात आहे. एका भागात अनिल देशमुख आणि दुसऱ्या भागात डेलकर प्रकरणाचा उल्लेख आहे. परमबीर सिंह यांनी लिहिलेले हे पत्र धक्कादायक आहे. बदली झाल्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिले आहे. मात्र या पत्रावर परमबीर सिंह यांची सही नाही. तसेच पैसे कसे दिले घेतले गेले याचा उल्लेख नाही. तसेच पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंह यांचाच होता, असा दावाही शरद पवार यांनी केला. तसेच उत्तम अधिकाऱ्याकडून या प्रकणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारParam Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझेAtul Bhatkalkarअतुल भातखळकरPoliticsराजकारण