शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांची निवडक व्यंगचित्रे

By admin | Updated: June 19, 2016 00:00 IST

राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारे बाळासाहेब ठाकरे एक उत्तम व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबांना व्यंगचित्रकार म्हणून घडविण्यात त्यांच्या वडिलांचा म्हणजेच प्रबोधनकारांचा सिंहाचा वाटा आहे. व्यंगचित्रकार पत्रकार शिवसेनाप्रमुख हिंदुरक्षणकर्ता म्हणून वेगळा ठसा बाळासाहेबांनी उमटवला आहे.बाळासाहेबांनी कुंचल्याच्या फटकाऱ्याने लेखणीतील अंगाराने अंगी असलेल्या कणखर नेतृत्वाने महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानात आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला ...

राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारे बाळासाहेब ठाकरे एक उत्तम व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबांना व्यंगचित्रकार म्हणून घडविण्यात त्यांच्या वडिलांचा म्हणजेच प्रबोधनकारांचा सिंहाचा वाटा आहे. व्यंगचित्रकार पत्रकार शिवसेनाप्रमुख हिंदुरक्षणकर्ता म्हणून वेगळा ठसा बाळासाहेबांनी उमटवला आहे.

बाळासाहेबांनी कुंचल्याच्या फटकाऱ्याने लेखणीतील अंगाराने अंगी असलेल्या कणखर नेतृत्वाने महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानात आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला होता.

प्रबोधनकारांना बाळासाहेब हे संगीतकार व्हावेत असं वाटायचं म्हणून त्यांनी बाळासाहेबांना एक बुलबुलतरंग आणून दिला. परंतु त्यांना तो जमला नाही आणि हाती त्यांनी कुंचला घेतला. ‘मराठा मंदिर’ नावाचे एक मासिक त्या काळी निघत असे. बाळासाहेबांची तीन-चार व्यंगचित्रे त्या मासिकात प्रथम प्रसिध्द झाली.

दैनिकात व्यंगचित्रे काढण्याची संधी त्यांना ‘फ्री प्रेस’ या इंग्रजी दैनिकात लाभली. ‘फ्री प्रेस’मध्ये सुरुवातीस प्रशिक्षणार्थी म्हणून अल्प वेतनावर काम करण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीत ‘फ्री प्रेस’मधील त्यांच्या व्यंगचित्रांनी ते मान्यताप्राप्त झाले. बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून नावारूपास आले होते.

बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांची दखल परदेशी वृत्तपत्रेदेखील घेऊ लागली होती. हिंदुस्थानी राजकीय व सामाजिक घडामोडींवर आधारित असणारी त्यांची व्यंगचित्रे म्हणजे परदेशातील वृत्तपत्रांना एक मेजवानीच असे.

१९५९ साली बाळासाहेबांनी स. का. पाटील यांच्यावर व्यंगचित्र काढले. तेव्हा संपादक नायर यांनी ते छापू नका असे सांगितले. तेव्हा बाळासाहेब नायर यांच्यावर चिडले आणि ‘फ्री प्रेस’ मधून राजीनामा दिला.

बाळासाहेबांना आवडणाऱ्या व्यंगचित्रकारांत आर. के. लक्ष्मण व डेव्हिड लो यांचा समावेश होता. बाळासाहेब भाषणादरम्यान करणा-या टिप्पणीतून वन लाईनर आणि गंमतीतून त्यांच्यातील व्यंगचित्रकार नेहमी समोर यायचा.

विन्स्टन चर्चिल यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरित्रात व्यंगचित्रे समाविष्ट करण्यात आली होती. यात हिंदुस्थानातून तीन व्यंगचित्रे देण्यात आली होती आणि ही तिन्ही व्यंगचित्रे बाळासाहेबांच्या वाट्याला आली.

पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले.

मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली.

संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला.