शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

स्टेडियमला स्वत:चे नाव देणाऱ्या मोदींचा संजय राऊतांकडून शेलक्या शब्दात समाचार, म्हणाले आता मोदी...

By बाळकृष्ण परब | Updated: February 25, 2021 11:18 IST

Sanjay Raut criticizes Narendra Modi : जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या अहमदाबादमधील मोटेराचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे.

मुंबई - जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या अहमदाबादमधील मोटेराचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. दरम्यान, या नामकरणावरून आता जोरदार राजकारण पेटले आहे. सरदार पटेलांचे नाव वगळून स्वत:चे नाव देण्याच्या निर्णयावरून नरेंद्र मोदींवर विरोधक सडकून टीका करत आहेत. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव देण्याच्या निर्णयाचा समाचार घेतला आहे. (Sanjay Raut criticizes Narendra Modi for gave own name to the Cricket stadium )संजय राऊत म्हणाले की, अशा निर्णयांबाबत एखादा राजकीय पक्ष किंवा सरकार फार काही बोलू शकत नाहीत. प्रत्येक राज्यात अनेक नेत्यांची नावे अशा प्रकारे दिली जातात. आता स्टेडियमला नाव देण्यास त्या राज्यातील सरकार आणि क्रिकेट संघटनेने मान्यता दिली आहे. मात्र मोदी आता मोठे नेते झाले आहेत. त्यामुळे मोदी आता सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.दरम्यान, जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या या स्टेडियमचे औपचारिक उदघाटन काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. आतापर्यंत मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे.

 

 

टॅग्स :Narendra Modi Stadiumनरेंद्र मोदी स्टेडियमNarendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊत