शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२८२ जागांचे निकाल नवीन मतदारांच्या हाती युवकांना तोंडभरून आश्वासने; राजकीय पक्षांमध्ये चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:18 IST

वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले व लोकसभा निवडणुकांत पहिल्यांदाच मतदान करणार असलेले युवा मतदार २८२ मतदारसंघांमधील निकालांना कलाटणी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

नवी दिल्ली : वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले व लोकसभा निवडणुकांत पहिल्यांदाच मतदान करणार असलेले युवा मतदार २८२ मतदारसंघांमधील निकालांना कलाटणी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.निवडणूक आयोगाच्या एका दस्तावेजात याची माहिती देण्यात आली आहे. सन १९९७ ते २००१ या कालावधीत जन्माला आलेले गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र नव्हते. आगामी निवडणुकांत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा मतदान करणारे सरासरी १ लाख ४९ हजार नवमतदार असणार आहेत. गेल्या, २०१४च्या लोकसभा निवडणुकांत २९७ मतदारसंघांत उमेदवार ज्या मताधिक्याने निवडून आले त्यापेक्षा हा आकडा मोठा आहे.यातील हजारो मतदारांना २०१४ पासून झालेल्या विधानसभा निवडणुकांत मतदान करण्याची संधी मिळाली असण्याची शक्यता आहे. तरी हे सर्व नवमतदार पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करतील. त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपा व काँग्रेस दोघांचेही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्यापासून ते युवकांना शिक्षणापासून अनेक गोष्टींची संधी मिळवून देण्यापर्यंतची आश्वासने हे व अन्य पक्षही देत आहेत.राज्यनिहाय वर्गवारीनवे युवक मतदार ज्या २८२ मतदारसंघांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील त्यातील २१७ हे १२ प्रमुख राज्यांतील आहेत. पश्चिम बंगाल (३२ जागा), बिहार (२९), कर्नाटक (२०), तामिळनाडू (२०), राजस्थान (१७), केरळ (१७), झारखंड (१३), आंध्र प्रदेश (१२), महाराष्ट्र (१२), मध्य प्रदेश (११), आसाम (१०) अशी त्यांची वर्गवारी आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९