शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपला मदत करणारे अधिकारी तातडीने दूर करा; काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीतील सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 06:38 IST

तिघांनीही एकत्र येऊन लढा, बैठकीचा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार असून मुख्यमंत्र्यांना देखील देणार आहे असे सांगण्यात आले.

अतुल कुलकर्णीमुंबई : महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचे आहे. तिघांनी एकत्र येऊन संकटांना सामोरे गेले पाहिजे. एकटे लढल्यामुळे जो परिणाम असायला हवा तो साधला जाणार नाही. तसेच भाजपशी जवळीक असणारे अधिकारी शोधून तातडीने दूर करावेत, असा सूर काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीत उमटला. 

बैठकीचा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार असून मुख्यमंत्र्यांना देखील देणार आहे असे सांगण्यात आले. आम्ही आढावा बैठक घेतली आहे एवढा संदेश आमच्या मित्रपक्षांना पुरेसा आहे, असे एका ज्येष्ठ नेत्याने बोलताना स्पष्ट केले. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. सरकारवर ज्या पद्धतीने भाजप हल्ला चढवत आहे, तो पाहता या राजकीय हल्ल्यांना एकत्रितपणे उत्तर देण्याची गरज आहे. मात्र तसे न होता ज्या पक्षाच्या मंत्र्यांवर आरोप होत आहेत, त्या पक्षाचे मंत्री उत्तर देताना दिसत आहेत. धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्या प्रकरणात हेच दिसून आले. आता अनिल देशमुख प्रकरणाची बाजूदेखील राष्ट्रवादीचे नेते मांडताना दिसत आहेत. हे होऊ द्यायचे नसेल आणि एकत्रितपणे सगळ्यांचे सरकार आहे असे दाखवायचे असेल तर विश्वासात घेऊन रणनीती ठरवावी लागेल, असेही बैठकीत चर्चेला आले.

अधिकारी भाजपला माहिती देतातसरकार बदलले तरी भाजपशी जवळीक असणारे अनेक अधिकारी आजही महत्त्वाच्या पदावर आहेत. त्या अधिकाऱ्यांना तातडीने बदलण्याची गरज आहे. तसे बदल केले नाही तर हे अधिकारी सरकारमधील माहिती भाजपाला देतील. सातत्याने हेच होत आल्याचे दिसत आहे. त्यामुळे असे अधिकारी शोधून तातडीने त्यांना दूर करणे हा महत्त्वाचा विषय मुख्यमंत्र्यांनी हातात घ्यावा लागेल. अशीही चर्चा बैठकीत झाली. सर्व मंत्र्यांची मते आम्ही जाणून घेतली. आमचा अहवाल आणि केंद्र सरकारला पाठवू, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

समन्वय समितीवर भरराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना त्यांच्या पक्षाचे मंत्री जाऊन भेटतात. माहिती देतात, त्यात गैर काही नाही. मात्र तीनही पक्षांमध्ये वाद-विवाद झाल्यास किंवा सरकारवर काही गंडांतर आल्यास समन्वय समितीची बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा, असे सरकार स्थापन करताना ठरले होते. समन्वय समितीची बैठक तातडीने घेतली गेली पाहिजे. जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, याची वस्तुस्थिती सर्व मंत्र्यांना विश्वासात घेऊन सांगितली पाहिजे, असेही काही मंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसsachin Vazeसचिन वाझे