शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

रणजितसिंह मोहिते यांची ‘साखरपेरणी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 02:12 IST

भाजपा मंत्र्यांची भेट; उमेदवारीसाठी फिल्डिंग की आणखी काही?

- अतुल कुलकर्णी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र रणजितसिंह यांंनी त्याचा इन्कार केला आहे. दुसरीकडे त्यांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही, असा दावा राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला.सोमवारी स्वत: शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत विजयसिंह मोहिते यांना लढण्यास सांगितले. त्यावर विजयसिंह मोहिते यांनी माझ्याऐवजी रणजितला उमेदवारी द्या, असा आग्रह पवारांकडे धरला. त्यावेळी तुमच्यासाठीच मी जागा सोडत आहे असे पवारांनी सांगितले; पण मोहितेंनी मुलासाठीचा आग्रह सोडला नाही. त्यानंतर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माण खटावचे काँग्रेसचे नेते जयकुमार गोरे, करमाळ्याच्या रश्मी बागल, माढ्याचे राष्टÑवादीचे नेते बबनदादा शिंदे या सगळ्यांनी रणजित यांच्या उमेदवारीला विरोध केला.रणजित यांनी मतदारसंघाशी संबंध ठेवलेला नाही, महसूल मंत्री चंद्रकात पाटील स्वत: रणजित यांचा विषय हाताळत आहेत, अशा तक्रार पवारांकडे करण्यात आली. एकवेळ विजयसिंह मोहिते यांना तिकीट दिले तर त्यांच्यासाठी काम करु; पण रणजितसाठी नाही, अशी भूमिकाही काही नेत्यांनी घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.भाजपा प्रवेशाची चर्चाच झाली नाही : रणजितरणजित मोहिते म्हणाले, काल बारामती हॉस्टेलवर मिटींग झाली; त्यात साखर कारखान्याचे विषय निघाले. त्याचवेळी आता आपल्याला मंत्र्यांना भेटण्याचे ठरले होते. पण आपण भेटलो की लगेच त्याच्या बातम्या होतील हेही बोललो होतो आणि आज झाले तसेच. शंकर सहकारी साखर कारखाना बंद आहे, तो मी चालवायला घेतलाय. त्याच्या प्रश्नांसाठी मी मंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रश्नच येत नाही आणि आपण स्वत:साठी आग्रह धरलेला नाही, असे रणजितसिंह यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक