शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
2
काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा
3
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
4
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
5
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
6
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
7
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?
8
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
9
पावसाचं आगमन अन् भारतीय कर्णधाराची तारांबळ; रोहित-द्रविडचा मजेशीर VIDEO
10
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती
11
इंग्लंडमध्ये तरूणीने पाकिस्तानच्या शादाबची लाज काढली; एका वाक्यातच बोलती बंद
12
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
13
4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!
14
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
15
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
16
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
17
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
18
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
19
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
20
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

मोठी बातमी! रजनिकांत राजकीय पक्ष काढणार नाहीत, जाहीर केली माघार

By मोरेश्वर येरम | Published: December 29, 2020 12:58 PM

"मला सांगताना अतिशय वाईट वाटतंय की मी सध्यातरी कोणताही राजकीय पक्ष सुरू करणार नाही"

ठळक मुद्देरजनिकांत ३१ डिसेंबर रोजी राजकीय पक्षाची घोषणा करणार होतेप्रकृतीच्या कारणास्तव रजनीकांत यांनी घेतला मोठा निर्णयराजकीय पक्ष काढणार नसलो तरी मदत करत राहणार, रजनिकांत यांचं मत

तामिळनाडूसुपरस्टार रजनिकांत यांनी आज तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीआधी मोठी घोषणा केली आहे. कोणताही राजकीय पक्ष स्थापन करत नसल्याचं रजनिकांत यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केलं आहे. रजनिकांत यांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांनी माघार घेतल्याचं सांगितलं जात आहे. 

"मला सांगताना अतिशय वाईट वाटतंय की मी सध्यातरी कोणताही राजकीय पक्ष सुरू करणार नाही. पण तामिळनाडूच्या जनतेसाठी विविध माध्यमातून काम सुरुच राहील", असं रजनिकांत यांनी जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याचाही उल्लेख त्यांनी पत्रकात केला आहे. याशिवाय, या निर्णयामागे मला 'बळीचा बकरा' बनविल्याच मत तयार करुन घेण्याचा गैरसमज कुणी करुन घेऊ नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

रजनिकांत यांनी ३१ डिसेंबर रोजी राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचं याआधी जाहीर केलं होतं. त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती. नव्या वर्षात होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा रजनिकांत यांचा निर्णय जवळपास पक्का झाला होता. रजनिकांत यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही पाहिलं जाऊ लागलं होतं. पण आता रजनिकांत यांनी माघार घेतल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

रजनिकांत हैदराबादमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना आजारी पडले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रजनिकांत यांना आता डिस्चार्ज मिळाला असून ते राहत्या घरी आराम करत आहेत. 

गेल्या काही महिन्यांपासून रजनिकांत राज्यात आपल्या समर्थकांसोबत बैठका घेत होते. यात ते राजकारणात एण्ट्री घेण्यासाठीची पूर्वतयारी करत होते. गेल्याच वर्षी रजनिकांत यांनी याबाबतची माहिती ट्विटवर दिली होती. यावर्षाच्या शेवटी ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करत होते. तामिळनाडूमध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असून यासाठी डीएमके, एआयएडीएमके, भाजप यांच्यासोबत अभिनेते कमल हसन यांचा पक्ष देखील रिंगणात उतरला आहे.

टॅग्स :rajinikanthरजनीकांतTamilnaduतामिळनाडू