शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"प्यार किया तो डरना क्या?," आता शिवसेना नेत्याने केली धनंजय मुंडेंची पाठराखण

By बाळकृष्ण परब | Updated: January 13, 2021 18:53 IST

Dhananjay Munde News : बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेने मात्र धनंजय मुंडे यांनी जोरदार पाठराखण केली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला धनंजय मुंडेंचा बचाव सत्तार म्हणाले की, संबंधित महिलेसोबतच्या संबंधांबाबत धनंजय मुडे यांनी सोशल मीडियावरून कबुली दिली आहेदोघांच्या संमतीने असलेल्या संबंधांची त्यांनी कबुली दिली आहे

जालना - एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राज्य सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत आले आहेत. या प्रकरणी सदर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र धनंजय मुंडे यांनी जोरदार पाठराखण केली आहे. प्यार किया तो डरना क्या..., अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडेंचा बचाव केला आहे.अब्दुल सत्तार म्हणाले की, संबंधित महिलेसोबतच्या संबंधांबाबत धनंजय मुडे यांनी सोशल मीडियावरून कबुली दिली आहे. दोघांच्या संमतीने असलेल्या संबंधांची त्यांनी कबुली दिली आहे. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना उद्देशून काढलेल्या उदगारांचीही आठवण काढली आणि प्यार किया तो डरना क्या, असे बाळासाहेब तेव्हा म्हणाले होते, असे सांगितले.तसेच भाजपाच्या अनेक नेत्यांनीही निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रामध्ये माहिती लपवली होती. अशा नेत्यांची नावे आपण लवकरच जाहीर करू, असा इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.दरम्यान, बलात्काराचा आरोप झाल्याने धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून चौफेर टीका होत आहे. त्यादरम्यान, मुंडे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. तसेच आज दिवसभरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेटली आहे. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेAbdul Sattarअब्दुल सत्तारPoliticsराजकारण