शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचं नेक्स्ट मिशन ठरलं; मोदींच्या महत्त्वाकांक्षी 'आयडियाच्या कल्पने'वर जोरात काम सुरू

By कुणाल गवाणकर | Updated: December 27, 2020 08:54 IST

येत्या काही आठवड्यांत भाजपकडून २५ वेबिनारचं आयोजन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या जाहीर सभांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'ची कल्पना मांडली आहे. देशाच्या प्रगतीचा वेग वाढावा, विकासकामं थांबू नयेत यासाठी देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका व्हाव्यात असा विचार मोदींनी अनेकदा बोलून दाखवला आहे. याबद्दल जनजागृती निर्माण व्हावी यासाठी आता भारतीय जनता पक्षानं काम सुरू केलं आहे. येत्या काही आठवड्यांत भाजपकडून २५ वेबिनार्सचं आयोजन करण्यात आलं आहे.वेबिनारच्या माध्यमातून वन नेशन वन इलेक्शनचे फायदे सांगण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान मोदींनी अनेकदा वन नेशन, वन इलेक्शनचा विचार मांडला आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी झाल्यास विकासकामं थांबणार नाहीत. निवडणुकीवेळी लागू असलेल्या आचारसंहितेचा फटका विकासकामांना आणि निर्णय प्रक्रियेला बसणार नाही, अशी भूमिका मोदींनी अनेकदा मांडली आहे.वन नेशन, वन इलेक्शनबद्दल जनजागृती करण्यासाठी २५ वेनिबार्सचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं दिली. या वेबिनार्समध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते विचार मांडतील. वन नेशन, वन इलेक्शनचे फायदे त्यांच्याकडून सांगितले जातील. शिक्षण आणि कायदा विषयातील तज्ज्ञांना वेबिनार्ससाठी निमंत्रित करण्यात येणार असल्याचं भाज नेत्यानं सांगितलं.काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात काही महिन्यांनी निवडणुका होत असतात. एका राज्यातील निवडणूक संपल्यावर दुसऱ्या राज्यात निवडणूक होते. त्याचा परिणाम विकासकामांवर होतो. त्यामुळे वन नेशन, वन इलेक्शनबद्दल गांभीर्यानं विचार मंथन होणं, त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे, असं मत मोदींनी अनेकदा व्यक्त केलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभा