शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया यांना करावा लागेल कठोर आव्हानांचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 06:11 IST

प्रियंका गांधी-वाड्रा यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : प्रियंका गांधी-वाड्रा यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. लोकसभा निवडणुकीआधी त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारीही सोपवण्यात आली. तर ज्योतिरादित्य पश्चिम उत्तरप्रदेशची आघाडी सांभाळणार आहेत; परंतु या दोघांसाठीही पुढची वाटचाल वाटते तितकी सोपी असणार नाही. अनेक कठोर आव्हानांचा त्यांना सामना करावा लागणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका सध्या अमेरिकेत आहेत. जवळच्या व्यक्तीच्या आरोग्य तपासण्यांसाठी कुटुंबातील सदस्यांसह त्या तीन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेला गेल्या आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परतल्यावर त्या दिलेल्या जबाबदारीवर काम सुरु करतील.उत्तर प्रदेशच्या आघाडीवर त्यांचा प्रवास तितका सोपा-सरळ नसेल. त्यांना असे ३३ लोकसभा मतदारसंघ सोपवले आहे जिथे २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. राहुल गांधी यांनी अत्यंत विचारपूर्वकपणे ही राजकीय चाल खेळली आहे.प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांना एकेका मतासाठी झगडावे लागणार आहे. आता काँग्रेसने सर्व लक्ष बाराबांकी (दुसरे स्थान), कुशीनगर (दुसरे), मिर्झापूर (तिसरे), प्रतापगढ (तिसरे) आणि वाराणसी (तिसरे) या मतदारसंघावर केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. वाराणसीमध्ये सर्व विरोधी पक्षांनी मिळून भाजपाचे बंडखोर शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी देण्यासाठी चर्चा सुरु आहेत.तसेच सहारणपूर, गाझियाबाद (राज बब्बर यांनी लढवलेली), लखनौ (रितू बहुगुणा जोशी ज्या पराभवानंतर भाजपावासी झाल्या), कानपूर (श्रीप्रकाश जयस्वाल) आणि खेरी या मतदारसंघावर लक्ष देणार आहे जिथे काँग्रेस दुसऱ्या स्थानी होती. येथेही प्रियंका व ज्योतिरादित्य या दोघांना प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९