शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशअण्णा, राग करू नका... ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 13:23 IST

Politics Kolhapur : प्रकाशअण्णा...., राग करू नका कोणत्याही समस्येला थेट माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कोल्हापुरातील सीपीआरच्या धर्तीवर इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयातील सेवा लवकरच सुरू होतील, असेही आवाहन त्यांनी केले आहे. 

ठळक मुद्दे प्रकाशअण्णा, राग करू नका, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन कोणत्याही समस्येला थेट माझ्याशी संपर्क साधा

कोल्हापूर : प्रकाशअण्णा...., राग करू नका कोणत्याही समस्येला थेट माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कोल्हापुरातील सीपीआरच्या धर्तीवर इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयातील सेवा लवकरच सुरू होतील, असेही आवाहन त्यांनी केले आहे. मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयाला मी आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी १५ मे २०२१ रोजी भेट दिली होती. त्यावेळी आम्ही दोन घोषणा केल्या होत्या. सिटीस्कॅन तात्काळ मंजूर करू आणि आयजीएम रुग्णालयाची दर्जोन्नती करून बेड वाढवून आयजीएम हे सीपीआरच्या धर्तीवर करू.

त्यानंतर मुंबईला २४ मे २०२१ तारखेला जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्याशी बैठक घेऊन या बैठकीत तत्त्वतः मान्यता घेतली. रीतसर प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य विभाग व अर्थखात्याने तात्काळ मंजुरी देण्याचे मान्य केले. ५० बेड वाढ व सिटीस्कॅनचे टेंडर निघाले आहे. सहा निविदा धारकांनी प्रतिसाद दिला आहे. खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. सिटीस्कॅन आम्ही जेव्हा बसवू, त्यावेळी तेथील विधानसभेचे लोकप्रतिनिधी म्हणून आपणास आवर्जून बोलावू , काळजी नसावी. शासनाच्या या संपूर्ण प्रक्रियेत तातडीने एवढ्या दोन गोष्टी करणे आणि मान्यता मिळवून देणे, मला वाटतं अनेक वर्षे या शासनात काम केलेल्या प्रकाश आवाडे यांना किती वेळ लागतो आणि किती जलद हे काम झालं याची जाणीव झालीच असेल.आमदार प्रकाश आवाडे यांना माझी विनंती आहे, असे कोणतेही प्रश्न, समस्या असल्यास माझ्याशी संपर्क साधा. तात्काळ महाविकास आघाडी त्याला प्रतिसाद देईल.

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफPrakash Awadeप्रकाश आवाडेkolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजी