शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राजकारण फक्त निवडणुकीपुरते’; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या 'कानपिचक्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 06:06 IST

डॉ. राहुल पंडित यांच्यासह ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर यांचा गौरव 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राजकारण निवडणुकीपुरते ठीक; पण इतर वेळी मतभेद विसरून समाजासाठी काम करणे गरजेचे आहे, तरच लोकप्रतिनिधी म्हणवून घेण्याचा अधिकार आपल्याला उरतो, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ३५ जणांना ‘महाराष्ट्र जन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल म्हणाले, चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारल्यास त्यांना बळ मिळते. सत्कारमूर्तींमध्ये कला, क्रीडा, आरोग्य, पत्रकारिता, समाजसेवा, राजकारण आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांचा समावेश आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्राच्या मातीने आजवर अनेक रत्ने घडविली आणि यापुढेही घडवीत राहील, यात शंका नाही.  माजी मंत्री सुबोध सावजी म्हणाले की, मी आजवरच्या माझ्या राजकीय कारकीर्दीत अनेक राज्यपाल पाहिले; पण जनसामान्यांपर्यंत पोहोचणारे भगतसिंग कोश्यारी हे पहिलेच. त्यामुळेच लोकप्रिय राज्यपाल म्हणून त्यांचा लौकिक आहे.

महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार विजेते‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, अभिनेता अनुप सोनी, अभिनेत्री अर्चना शर्मा, पद्मश्री डॉ. अशोक गुप्ता, भूषण महाजन, डॉ. दीपक नामजोशी, डॉ. दीपक पाटकर, अकोल्याचे माजी आमदार गजानन दाळू, डॉ. जी. पी. रत्नपारखी, आमदार गोपीकिशन बाजोनिया, माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा, पद्मश्री हरिहरन अनंतसुब्रमणी, डॉ. हुझैफा खोराकीवाला, डॉ. कमल जांगीड, मंजू लोढा, डॉ. मिन्नी बोधनवाला, मार्विन फर्नांडिस, मोनिषासिंग कटियाल, डॉ. नीरज मर्के, माजी आमदार प्रदीप वडनेरे, डॉ. प्रवीण कहळे, राहुल कराड, डॉ. राहुल पंडित, डॉ. कर्नल राजेश आढाव, आमदार राजेश एकडे, रवी दुबे, ॲड. रुबिना रिझवी, डॉ. समीर सदावर्ते, संग्राम सिंग, सुदेश भोसले, माजी आमदार सुहास तिडके, स्वप्नील माने, डॉ. वृषाली माने, डॉ. अमजदखान पठाण. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी