शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मला भाजपमधून फक्त 'त्या' एका नेत्याचा फोन आला; खडसेंनी सांगितलं नाव

By कुणाल गवाणकर | Updated: October 22, 2020 12:38 IST

eknath khadse: फडणवीसांवर टीका करत खडसेंचा भाजपला रामराम; उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

जळगाव: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काल पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. खडसे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. त्याआधी आज पत्रकारांशी संवाद साधताना खडसेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधलं. माझा नेमका गुन्हा काय, पक्षातल्या इतर मंत्र्यांवरही आरोप झाले असताना केवळ माझाच राजीनामा का घेतला, मला वेगळी वागणूक का दिली गेली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. एकनाथ खडसे पुन्हा फडणवीसांवर बरसले; थेट मोदी-शहांची नावं घेऊन बोललेमाझ्यावर होत असलेल्या अन्यायाची व्यथा मांडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र कोणीही मला गांभीर्यानं घेतलं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 'दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. माझ्यावर झालेला अन्याय त्यांना सांगितला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटलो. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून गाऱ्हाणं मांडलं. तुम्ही देवेंद्र यांना घेऊन या. आपण चर्चेतून मार्ग काढू असं सांगण्यात आलं. हा निरोप मी देवेंद्रजींना दिला. त्यावर पुढील आठवड्यात जाऊ. पुढील महिन्यात जाऊ, असं म्हणत त्यांनी ४ वर्षे घालवली,' असं खडसे यांनी सांगितलं....अन् फडणवीसांनी ताफ्याची दिशाच बदलली; गाडी अचानक 'त्या' दिशेनं वळवलीखडसेंच्या राजीनाम्यानंतर राज्यातल्या भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. खडसेंनी पक्ष सोडायला नको होता, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यावरही खडसेंनी भाष्य केलं. 'माझ्याविरोधात करण्यात आलेल्या कट कारस्थानांचे पुरावे पक्षाला दिले. मात्र तरीही कारवाई झाली नाही. त्यामुळे पक्षाला आता माझी गरज राहिलेली नाही, हे माझ्या लक्षात आलं. मी नाराज असताना, सहा महिन्यांपासून पक्षांतरांची चर्चा असतानाही कोणीही संपर्क साधला नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला फोन केला. चर्चा करून मार्ग काढू म्हणाले. पण अखेरपर्यंत मार्ग निघालाच नाही,' असं खडसे म्हणाले.भाजप सोडणाऱ्यांची यादी मोठी; पण काहींनाच झाला फायदाभाजप-शिवसेनेचं सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र केवळ मलाच राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. इतरांना मात्र क्लीन चीट देण्यात आल्या. इतरांना आणि मला वेगळा न्याय का, असा सवाल खडसेंनी विचारला. फौजदारी गुन्हे असलेल्या, इतर पक्षांमधून आलेल्यांना पाठिशी घालण्यात आलं. पण पक्षासाठी ४० वर्षे राबणाऱ्या नेत्यावर सातत्यानं अन्याय करण्यात आला, अशा शब्दांत खडसेंनी फडणवीस यांना लक्ष्य केलं.एकनाथ खडसेंनी हातात ‘घड्याळ’ बांधलं आता पंकजा मुंडेंनी 'शिवबंधन' बांधावं, शिवसेनेची ऑफरदेवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्त्व फारच सक्षम आहे. त्यांच्यामुळेच आम्ही राज्यातील सत्ता गमावली, असा उपरोधिक टोलाही खडसेंनी लगावला. २०१४ मध्ये आमच्याकडे पैसा, साधनं नव्हती. तरीही आम्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोबत नसतानाही १२३ जागा जिंकलो. पण २०१९ मध्ये केंद्रात, राज्यात सत्ता असताना, शिवसेनेसोबत युती असतानाही १०५ जागांवर आलो. देवेंद्रजी मी पुन्हा येईन म्हणत होते. लोकांना हा अहंकार आवडला नाही. त्याऐवजी आम्ही पुन्हा येऊ म्हणायला हवं होतं, असं खडसे म्हणाले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंह