शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

"शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासून जोमाने कामाला लागा" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 15:41 IST

Mumbai : शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी मार्गदर्शन करताना मुंबई महापालिका निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी प्रत्येक प्रभागात वॉररुम तयार करावी तसेच इमारत प्रमुख नेमावेत असे आवाहन केले.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : कोरोना या वैश्विक महामारीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कसलेल्या सेनापतीप्रमाणे राज्याला मार्गदर्शन केले आहे. 'सार्वजनिक आरोग्य' या विषयावर मुख्यमंत्र्यांचा असलेला अभ्यास व त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी राबवलेली 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम, यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव हळूहळू नियंत्रणात येत आहे. ज्याप्रमाणे टाळेबंदीतून बाहेर पडण्यासाठी आपण 'पुनश्च हरिओम' केले. त्याचप्रमाणे संघटनात्मक पातळीवरही आता पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागण्याची गरज आहे, असे शिवसेना नेते व राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी विभागातील जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागा, असे आवाहन सुभाष देसाई यांनी केले आहे.  बोरिवली पश्चिम, म्हात्रे वाडी, कोरो केंद्रा जवळील साई कृपा हॉल मध्ये काल रात्री झालेल्या विभाग क्रमांक 1 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी येथील सुमारे 100 शिवसेनेचे पुरुष व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

कोविडच्या काळात विभागातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुकास्पद काम केले आहे. आता कोरोनाला रोखतानाच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करावे व विभागात शिवसेना सदस्यांची विक्रमी नोंदणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. तसेच सर्व शाखा शाखांतून मतदार नोंदणी प्रभावीपणे करावी असे मार्गदर्शन प्रास्ताविक भाषणात मेळाव्याचे आयोजक शिवसेना विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांनी केले.

शिवसेना विभाग क्र १ मधील सर्वच आजी व माजी पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे कार्यरत राहून संपू्र्ण विभागात भाजपाला रोखावे असे आवाहन शिवसेना उपनेते, मुंबई ईमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांनी केले. याशिवाय, शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी मार्गदर्शन करताना मुंबई महापालिका निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी प्रत्येक प्रभागात वॉररुम तयार करावी तसेच इमारत प्रमुख नेमावेत असे आवाहन केले.

याप्रसंगी शिवसेना विभाग क्र १ च्या आसीयू व व्हेंटिलेटर युक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण  उद्योगमंत्री  सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेवर आधारीत प्रभाग क्र.७ च्या नगरसेविका शीतल  म्हात्रे यांनी विभागातील नागरिकांना विनामूल्य वाटप करण्यासाठी तयार केलेल्या फेस मास्कचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. सदर मेळाव्यात व्यासपीठावरमागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, पालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षा  संध्या दोशी, आर मध्य व आर उत्तर वॉर्डच्या प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, विभाग संघटक सुजाता शिंगाडे व शिवसेनेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSubhash Desaiसुभाष देसाईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका