शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सवंगडी सांभाळताना आले नाकीनऊ, कार्टून वारचा दी एण्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 04:32 IST

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी ‘हायव्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळत आहे़

- चेतन धनुरेउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी ‘हायव्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळत आहे़ पारंपरिक वैैर जपलेल्या पाटील-राजेनिंबाळकर घराण्यातील पुढच्या पिढीत पुन्हा लढत रंगली असून, वैयक्तिक टीकेचे विखारी डोस पाजून झाल्यानंतर आता अखेरच्या टप्प्यात ते विकासाच्या अमृतप्याल्यात परावर्तीत झालेले दिसून येत आहेत़राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री आ़ राणाजगजितसिंह तर शिवसेनेकडून माजी आ़ ओम राजेनिंबाळकर हे चुलतभाऊ आमनेसामने आले आहेत़ प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात दोन्हीकडून ‘कार्टून वार’ रंगले़ दोघांचाही भूतकाळ अन् वर्तमानकाळ कुंचल्याच्या टोकदार टोकाने चितारत शितोंडेही उडविले गेले़ हे कार्टून वार थांबते न थांबते तेच दोन्हीकडून क्लीप वार रंगला़ आता या दोन्ही बाबींना अखेरच्या टप्प्यात विराम मिळाल्याचे दिसून येत आहे़ नीति आयोगाच्या यादीत मागास म्हणून नोंद असलेल्या उस्मानाबादच्या या स्थितीस जबाबदार कोण? यावरून सभांमधून मनोरंजक विधाने केली जात आहेत़ या सगळ्यात ‘विकास की बात’ मात्र भरकटलेली होती़ मतदारांमधून याविषयी नाराजी व्यक्त होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, आता आम्हीच कसा विकास घडवून आणू शकतो, यावर भर दिला जात आहे़उद्योग, रोजगार, २१ टीएमसी हक्काचे पाणी हे प्रमुख मुद्दे आता प्रचारात आले आहेत़ एकीकडे या घडामोडी सुरु असतानाच महाआघाडी व महायुतीतील सवंगडी सध्यातरी एकदिलाने काम करताना दिसताहेत़ मात्र, पूर्वानुभव लक्षात घेता अखेरच्या टप्प्यात ‘हात’ देण्याची परंपरा यावेळी पुन्हा सुरू राहणार नाही, याची काळजी राष्ट्रवादी घेत आहे़ दुसरीकडे बऱ्याचदा भाजप राष्ट्रवादीच्या मदतीला धावायची़ मात्र, यंदा एकेक खासदार महत्त्वाचा असल्याने, ती शिवसेनेबरोबर निष्ठेने काम करताना दिसत आहे़ तरीही त्यांना सांभाळून ठेवण्याचे कष्ट शिवसेनेला घ्यावेच लागत आहेत़ वंचित आघाडीच्या सभेला उत्स्फूर्त जमलेली गर्दी, स्वयंप्रेरणेने दिली जात असलेली मदत पाहता अर्जुन सलगर सावकाशपणे पुढे जाताना दिसत आहेत़ ही आघाडी पाटील किंवा राजेनिंबाळकरांना पराभूत करण्यात मोठा वाटा उचलणार हे एवढे मात्र निश्चित़

>आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले व विद्यमान आमदार राणाजगजितसिंह यांनी थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे़ आतापर्यंत शरद पवार, धनंजय मुंडे यांच्याच जाहीर सभा मतदारसंघात झाल्या आहेत़ नवाब मलिक, हर्षवर्धन पाटील यांचाही धावता दौरा झाला़ अन्य बडे नेते मतदारसंघात फिरकले नसले, तरी स्थानिक समीकरणे जुळवून आघाडी घेण्याची तयारी सुरू आहे़>माजी आमदार ओम राजेनिंबाळकर हे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच मित्रपक्षालाही सोबत ठेवून गावोगाव सभा घेत आहेत़ मतदारसंघातील औसा येथे झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यानंतर कळंबमध्ये झालेली पंकजा मुंडे यांची सभा वगळता महायुतीकडूनही बडे नेते अद्याप उतरले नाहीत़ आता रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उस्मानाबादेत सभा घेत आहेत़ छुप्या रसदीद्वारे पुढे जाण्याची तयारी वेगात आहे़>कळीचे मुद्देकृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणारे २१ टीएमसी पाणी अनेक वर्षांपासून कामातच अडकून पडले आहे़सततच्या अवर्षण स्थितीमुळे पडणारा दुष्काळ अन् तत्परतेने न मिळणारी मदत़ पीकविमा, चारा छावण्यांवरून असलेली नाराजी़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019osmanabad-pcउस्मानाबाद