शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

''अनंत गीते संसदेतील मौनी खासदार''

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 12:06 AM

संसदेत मौनी सदस्य म्हणून त्यांची ओळख बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

गुहागर : गेली अनेक वर्षे मी केंद्रात काम करतोय. सहा टर्म अनंत गीतेंना केंद्रात पाहतोय. एखादा जागरूक प्रतिनिधी केंद्रात असेल मग तो कुठल्याही पक्षाचा जरी असला तरी त्याला सहकार्य करणे माझे काम समजतो. अनंत गीते यांनी खासदार म्हणून कधीही तोंड उघडले नाही. लोकांचे प्रश्न, दु:ख कधी मांडलेले मला आठवत नाही. संसदेत मौनी सदस्य म्हणून त्यांची ओळख बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंच्या प्रचारार्थ शृंगारतळी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी पवार म्हणाले की, सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषद सदस्यापासून अर्थमंत्रीपर्यंत प्रदीर्घ काळ ग्रामीण पातळीपासून देशपातळीवर काम केले आहे. कोकणाचे नेतृत्व करणारा चांगला माणूस तटकरेंच्या रूपाने मिळाला आहे. ती कुवत तटकरेंमध्ये असल्याने त्यांची उमेदवारी महत्त्वाची आहे.खासदार प्रफुल्ल पटेल केवळ ७ महिने उद्योगमंत्री असताना काही हजार कोटींचा प्रकल्प भंडारा जिल्ह्यात आणला त्याचे कामही सुरू झाले. मात्र, सरकार बदलल्यानंतर अनंत गीते यांनी मंत्री म्हणून पुढील काम होऊ दिले नाही. याउलट सुनील तटकरे यांनी जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा पदाचा जनतेसाठी उपयोग करून आपला वेगळा ठसा उमटवला.

सुनील तटकरेंना जेव्हा जेव्हा संधी मिळाली, त्या सर्व पदांवर काम करताना त्यांनी कर्तृत्वाचा दाखला दिला आहे. कोकणाशी बांधिलकी असणारा हा नेता आहे. बॅ. नाथ पै, मधू दंडवते नंतर कोकणच्या नेतृत्वाची पोकळी सुनील तटकरे यांच्या रूपाने भरून निघेल, असे पवार म्हणाले.या वेळी सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, बाबाजी जाधव, संजय कदम, नवीनचंद्र बांदिवडेकर, चित्रा वाघ, रामचंद्र हुमणे, विक्रांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे कुमार शेटे, शेखर निकम, विनायक मुळे, सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यही या वेळी उपस्थित होते.
>पावसाचे सावट; भाषण थोडक्यातच आटोपलेसभा सुरू होण्यापूर्वीच ढगाळ वातावरण व वारा सुटला होता. शरद पवार यांचे भाषण सुरू होण्याआधीच पावसाचा जोर वाढल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये पांगापांग सुरू झाली होती. अशा परिस्थितीत समयसूचकता लक्षात घेऊन शेवटी शरद पवार यांनी थोडक्यातच आपले भाषण आटोपते घेतले.>तटकरे हे कोकणशी बांधिलकी असलेले नेतृत्व.कोकणच्या नेतृत्वाची पोकळी सुनील तटकरे यांच्या रूपाने भरून निघेल : शरद पवार.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारraigad-pcरायगडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Anant Geeteअनंत गीते