शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

काय सांगता! पंतप्रधानांच्या नावावर भाजपा ‘मोदी इडली’ विकणार; १० रुपयात पोटभरून मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 11:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ही इडली तामिळनाडूच्या सेलम शहरात विकण्यात येत आहे.

सेलम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता भारतातच नाही तर जगभरात पसरली आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे वर्ल्ड लीडर्स रेटींगमध्ये घसरण आली असली तरी मोदींची लोकप्रियता कमी झाली नाही. हेच उद्देशून तामिळनाडूमध्ये आता नरेंद्र मोदींच्या नावाने इडली विकण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी या इडलीला मोदी इडली असं नावही देण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ही इडली तामिळनाडूच्या सेलम शहरात विकण्यात येत आहे. शहरातील जवळपास २५ ते ३० दुकानांमध्ये मोदी इडलीची विक्री केली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण शहरात मोदी इडली विक्रीस उपलब्ध होणार आहे असं सांगितलं जात आहे. सेलम शहरात जागोजागी पंतप्रधानांच्या नावावर ‘मोदी इडली’ची जाहिरात केली जात आहे. या पोस्टर्सची चर्चा सगळीकडे सुरु आहे. मोदी इडलीमध्ये ग्राहकांना १० रुपयात ४ इडली खाण्यास मिळतील. त्यासोबत एका वाटीत सांबार आणि चटणी देण्यात येईल. म्हणजे १० रुपयात ग्राहकांचे पोट भरेल असा दावा करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर इडली विकण्याची आयडिया राज्यातील भाजपा नेते महेश यांच्या डोक्यात आली. त्यांनी शहरात त्याचे पोस्टर्स झळकावून जाहिरातही केली. सोशल मीडियात सध्या पंतप्रधानांसोबत इडलीचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. मोदी इडली ही खाण्यास स्वादिष्ट असेल, ताज्या आणि शुद्ध भाज्यांनी सांबार बनवण्यात येईल. दिवसाला ४० हजार इडली बनवण्यात येईल अशी माहिती भाजपाचे नेते महेश यांनी दिली आहे.

या फोटोत आपण पाहू शकता की, एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. उजव्याबाजूला भाजपा नेते महेश यांचा फोटो आहे. पोस्टरवर १० रुपयात मोदी इडली मिळणार आहे. त्यात ४ इडलीचा समावेश असेल, पुढील आठवड्यापासून ही विक्री शहरात सुरु होईल असं पोस्टर्सवर जाहिरात देण्यात आली आहे. माध्यमांशी बोलताना प्रदेश भाजपाचे सचिव भारत आर. बालासुब्रमण्यम यांनी सुरुवातीला मोदी इडली विक्रीसाठी काही दुकाने उघडण्यात येतील. याला लोकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्या आधारे मोदी इडली दुकानांची संख्या वाढवण्यात येईल अशी माहिती दिली आहे. राजकीय नेते मंडळींनी अशाप्रकारे योजना आणणं नवीन नाही, महाराष्ट्रातही शिवभोजन, राजस्थानात इंदिरा रसोई योजना अशाप्रकारे योजना आणल्या आहेत.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTamilnaduतामिळनाडू