शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

Modi Cabinet: मोदी सरकारमध्ये मुलगा मंत्री; तरीही शेतात मजुरी करतात आई-वडील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 21:27 IST

Minister L Murugan, Modi Cabinet Expansion: मुरुगन केंद्रात मंत्री झालेले असले तरी त्यांचे आईवडील त्यांच्या साध्या राहणीमानामुळे चर्चेत आले आहेत. ते राजकारणापासून दूर तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यातील कोन्नूर गावात चक्क मजुरी करतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi Cabinet) यांनी नुकताच मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच फेररचना केली. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले. यामध्ये एल मुरुगन (L Murugan) यांनाही राज्य मंत्री पद मिळाले आहे. मुरुगन हे तामिळनाडू भाजपाच्या एका विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वय 44 वर्षे आहे. मोठा राजकीय संघर्ष करून त्यांनी दिल्ली गाठली आहे. मात्र, त्यांच्यापेक्षा त्यांचे आई-वडीलच चर्चेत आले आहेत. (Central misister L Murugan story from Tamilnadu.)

मुरुगन केंद्रात मंत्री झालेले असले तरी त्यांचे आईवडील त्यांच्या साध्या राहणीमानामुळे चर्चेत आले आहेत. ते राजकारणापासून दूर तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यातील कोन्नूर गावात चक्क मजुरी करतात. मुरुगन मंत्री झाल्यानंतर जेव्हा पत्रकार त्य़ांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या कुटुंबाचा हा साधेपणा समोर आला आहे. कोन्नूर गावातील एका शेतात त्यांचे आई-वडील काम करत होते. एकाच्या शेतात त्यांची आई आणि दुसऱ्याच्या शेतात त्यांचे वडील राबत होते. आईचे वय 59 तर वडिलांचे वय 68 आहे. 

दोघांनाही हे काम करताना पाहून पत्रकारांना धक्का बसला. त्यांच्याकडे पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही, की ते एका केंद्रीय राज्यमंत्र्यांचे पालक आहेत. धक्कादायक म्हणजे या दोघांशी चर्चा करण्यासाठी पत्रकारांना त्या शेतमालकांची परवानगी घ्यावी लागली. मुलगा एल मुरुगन मोदी सरकारमध्ये मंत्री झाला आहे. मात्र, आईवडील दुसऱ्याच्या शेतात घाम गाळत आहेत. मुरुगन हे दलित आहेत. गावात त्यांचे छोटे घर आहे. आई-वडिलांना काम मिळाले की ते जातात. इकडे मुलगा मंत्री बनत होता, तिकडे दोघे शेतातून घरी येत होते. मुलाच्या यशावर आम्हाला गर्व आहे, परंतू घाम गाळून मिळालेल्या पैशांतून भाकरी खाणे आम्हाला आवडते, असे त्यांनी सांगितले. 

मुरुगन यांना कर्ज काढून शिकविले आहे. चेन्नईच्या आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये ते शिकले. यासाठी त्यांच्या वडिलांनी मित्रांकडून पैसे उधार घेतले होते. मुरुगन यांनी केंद्रात मंत्री झाल्याचे फोन करून कळविले होते. तेव्हा त्यांनी विभागाच्या अध्यक्षापेक्षा मोठे पद आहे का असा सवाल केला होता. आम्ही चेन्नईला त्याच्याकडे जात असतो. परंतू तो त्याच्या कामांमध्ये व्यस्त असतो. यामुळे आम्ही त्याला भेटून पुन्हा गावी येत, असे ते म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारTamilnaduतामिळनाडू