शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

"मन की बात आहे पण मनातले नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत", मनसेचा केंद्रासह राज्य सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 10:22 IST

Sandeep Deshpande : कोरोना परिस्थितीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यासह केंद्र सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या संकटामध्ये एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रात नव्या रुग्णांमध्ये घट होत आहे.

मुंबई : राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यामुळे कोरोना परिस्थितीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यासह केंद्र सरकारवर टीका केली आहे. (MNS Sandeep Deshpande Tweet on corona situation)

"लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातले नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळेच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही," असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.

"केंद्र, राज्यांनी लॉकडाऊनचा विचार करावा"देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून, कोरोना रुग्णांची एकूण संख्या दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

(कोरोनातून बरे झाल्यानंतर 'या' टेस्ट करणे महत्वाचे, दुर्लक्ष केल्यास अडचणी वाढू शकतील)

मुंबईसह १२ जिल्ह्यांमध्ये घसरला कोरोनाचा आलेखकोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या संकटामध्ये एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रात नव्या रुग्णांमध्ये घट होत आहे. राज्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, जळगाव सह १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांचा आकडा घटनांना दिसत आहे. महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही केरोना रुग्णांचा आलेख सपाट होत असून या राज्यांमध्ये लवकरच नव्या रुग्णांचा आलेख घटतांना दिसू शकेल, अशी आशा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. 

राज्यातील कोरोनाची स्थिती... राज्यात सोमवारी (काल) नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास १० हजारांनी जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्यात काल दिवसभरात ५९ हजार ५०० कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ६२१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार