शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget 2021: "कठीण परिस्थितीत आशेचा किरण दाखवणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प",  सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 20:35 IST

Maharashtra Budget 2021: उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात महिला विकास, उद्योग, रस्ते, रेल्वे, दळणवळण इ. सर्वच क्षेत्राच्या विकासासाठी भर देण्यात आला आहे

मुंबई - आज महाविकास आघाडी सरकारतर्फे राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोनासारखा कठीण काळ सोसून उभारी घेत असलेला महाराष्ट्र आजच्या अर्थसंकल्पाकडे आशा लावून होता. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात महिला विकास, उद्योग, रस्ते, रेल्वे, दळणवळण इ. सर्वच क्षेत्राच्या विकासासाठी भर देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली. 

पुणे-संगमनेर-नाशिक दरम्यान जलद रेल्वे मार्ग सुरु करण्याची आमची बऱ्याच आधीपासूनची मागणी होती. यानुसार यादरम्यान २३५ किमी अंतराचा जलद रेल्वे मार्ग करण्याची घोषणा केल्याने यादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा मोठा दिलासा असल्याने या निर्णयाबाबत  महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. सत्यजित तांबे यांनी मांडले.

कुटुंबातील स्त्रीच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे. हा महिला सबलीकरणासाठी ऐतिहासिक निर्णय ठरणार  असून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई योजना देखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना याचा उपयोग होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी सायन्स पार्क उभारण्याची घोषणा केल्याने युवकांना यातून नक्कीच मदत होईल अशी आशा तांबे यांनी व्यक्त केली. 

'कोरोनाच्या संकट काळात राज्याचे नुकसान झाले असताना आणि केंद्राकडून राज्याच्या GST चा वाटा पूर्णतः मिळत नसताना देखील राज्यातील प्रत्येक स्तरातील प्रत्येकाला योग्य न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री. अजित पवार, महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडी सरकार यांचे अभिनंदन.' अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश  युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी अर्थसंकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटPoliticsराजकारणSatyajit Tambeसत्यजित तांबे