शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

.. म्हणून महादेव जानकर अस्वस्थ : पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 10:27 IST

बारामती लोकसभा मतदारसंघात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याने अस्वस्थ असलेल्या महादेव जानकर यांनी आज पुण्यात रासपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आता ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. 

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याने अस्वस्थ असलेल्या महादेव जानकर यांनी आज पुण्यात रासपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आता ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. 

 

         २०१४पासून युतीच्या गोटात सामील झालेल्या जानकर यांना भाजपने कधीच हव्या तेवढ्या जागा आणि पदं दिलेली नसल्याचा रासपच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. सुमारे तीन वर्ष रुसवे-फुगवे केल्यावर त्यांना दुग्धविकास मंत्री म्ह्णून कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. भाजपमधील पंकजा मुंडे गटाचे मानले जाणारे जानकर यांनी माढा, बारामती किंवा परभणी यापैकी एक जागा आम्हाला मिळावी अशी मागणी केली होती. अर्थात ही जागा मिळाली असली तरी ती त्यांना न  मिळता कुल यांच्याकडे गेली आहे. मागील वेळी हक्काच्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना जानकर यांनी धावपळ करण्याची वेळ आणली होती. त्यामुळे यावेळी तिथे उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र ती डावलून मुख्यमंत्र्यांनी कुल यांना उमेदवारी दिली आहे. अर्थात यात फक्त जानकर यांचा बळी गेला नसून ते ज्या गटातून भाजपमध्ये टिकून आहेत त्यांनाही धडा शिकवल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे जानकर यांना स्वतःला नसली तरी  रासपला एक जागा देण्यात आली आहे. त्यामुळे नेमक्या कुठल्या कारणाचा गवगवा करून नाराजी दाखवायची हेही त्यांना शोधावे लागेल. बाहेर रासपच्या मतदारांमध्ये विचारले असता धनगर की धनगड यात त्यांचे आरक्षणाचे घोंगडे भिजत असल्याने तिकडेही जानकर यांच्याविषयी नाराजी आहे. याच सगळ्या मुद्द्यांवर विचार करण्यासाठी आणि अर्थात ताकद आजमावण्यासाठी त्यांनी पुण्यात पक्षाचा मेळावा आणि बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे आता या बैठकीत काय निर्णय होतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

 

(ता.क. : मागील आठवड्यात पुण्यात राजू शेट्टी यांच्यासोबतच्या मैत्रीचे जाहीर प्रदर्शन करून जानकर यांनी तिसरा पर्यायही खुला ठेवल्याचे बोलले जात आहे )

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMahadev Jankarमहादेव जानकरBaramatiबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारण