शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

...जेव्हा शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयासाठी शुभेच्छा देतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 23:05 IST

शिवसेना आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: शिवसेना-भाजपामध्ये युती झाली असली, तरी कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये मनोमीलन झालंय का, असा प्रश्न उपस्थित करणारी घटना ईशान्य मुंबई मतदारसंघात घडली. शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी एका भूमीपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. ईशान्य मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विद्यमान भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवाराला तीव्र विरोध दर्शवला होता. त्यानंतर भाजपानं किरीट सोमय्यांचं तिकीट कापून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. मात्र तरीही स्थानिक पातळीवर धुसफूस कायम आहे.नेतृत्त्वानं तिकीट कापल्यानंतरही किरीट सोमय्यांनी कोटक यांचा जोमानं प्रचार करण्यास सुरुवात केली. मात्र सोमय्या प्रचारातही नको, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यातच आता  शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी थेट राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका भूमीपूजन कार्यक्रमात बोलताना राऊत यांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या. 'संजय पाटील यांना शुभेच्छा. त्यांचा विजय होवो. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा', असं राऊत म्हणाले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शिवसेनेचे आमदार आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू असलेले सुनिल राऊत यांनी किरीट सोमय्यांविरोधात दंड थोपटले होते. सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास अपक्ष म्हणून त्यांना आव्हान देऊ, असं राऊत यांनी म्हटलं होतं. याशिवाय स्थानिक शिवसैनिकांनीदेखील सोमय्यांविरोधात भूमिका घेतली होती. सोमय्यांना तिकीट दिल्यास प्रचार करणार नाही, असा संदेश शिवसैनिकांनी मातोश्रीवर कळवला होता. त्यानंतर सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना मातोश्रीकडून भेटीसाठी वेळ देण्यात आली नाही. अखेर भाजपा नेतृत्त्वानं सोमय्यांचं तिकीट कापत मनोज कोटक यांना रिंगणात उतरवलं. सध्या सोमय्यांकडून कोटक यांचा प्रचार सुरू केला. मात्र याला शिवसैनिकांचा विरोध आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmumbai-north-east-pcमुंबई उत्तर पूर्वKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाShiv Senaशिवसेना