शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

दक्षिणेतील बाळासाहेबांनी आणली जान, द्रविडी आंदोलनाशी नाते; निम्म्या जागांवर महिलांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 05:00 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४ टक्के मते मिळवणारा एनटीके द्रविडी आंदोलनाशी नाते सांगत असल्याने तो यंदा प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तामिळ संस्कृती, तामिळ भाषा आणि त्यांची अस्मिता हा एकमेव अजेंडा घेऊन एनटीकेने जनतेला साद घातली आहे.

चेन्नई : अण्णा द्रमुक, द्रमुक, काँग्रेस, भाजपसह डझनभर पक्षांनी तामिळनाडू विधानसभेच्या आखाड्यात आपली शस्त्रास्त्रे पाजळली असतानाच आता तामिळनाडूची प्रादेशिक अस्मिता जपण्याचा दावा करणाऱ्या नाम तमिलर काची (एनटीके)नेही २३४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यातील निम्म्या जागांवर महिलांना संधी दिली आहे. (Life brought by Balasaheb in the south, relationship with Dravidian movement; Opportunity for women in half the seats)

 २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४ टक्के मते मिळवणारा एनटीके द्रविडी आंदोलनाशी नाते सांगत असल्याने तो यंदा प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तामिळ संस्कृती, तामिळ भाषा आणि त्यांची अस्मिता हा एकमेव अजेंडा घेऊन एनटीकेने जनतेला साद घातली आहे. एकेकाळी चित्रपट दिग्दर्शक असणाऱ्या सेंदामिळन सिमन यांनी २००९ मध्ये एनटीकेची स्थापना केली होती. सिमन हे तामिळनाडूच्या राजकारणात वारंवार प्रादेशिक हुंकार जोपासत असतात. त्यामुळे ते तामिळनाडूचे बाळ ठाकरे म्हणून  ओळखले जातात.

तामिळ हे हिंदू नाहीत- तामिळ हे हिंदू नाहीत. तामिळींची स्वतंत्र संस्कृती आहे, त्यांना ब्रिटिशांनीच हिंदूंशी जोडले असल्याचा दावा सिमन करत असतात, मात्र सिमन तामिळ लोकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप विराेधक करीत आहेत.  - एनटीकेने उपस्थित केलेल्या पारंपरिक तामिळ संस्कृतीच्या मुद्द्यामुळे प्रमुख पक्षांची अडचण झाली आहे. 

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१TamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूकPoliticsराजकारण