शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

नरेंद्र मोदींना शेवटची 2002 मध्ये भेटलेली, त्यांचा नावाचा 'त्रास'; पुतणी सोनल मोदी यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 20:50 IST

Narendra modi's niece Sonal Modi Reacted on Relations with Prime minister : नरेंद्र मोदी यांची पुतणी म्हणून मला तिकीट नाकारले गेले तर मला खूप दु:ख होईल, जर माझ्यापेक्षा जास्त चांगले कार्यकर्ते असतील आणि त्यांना तिकीट दिले तर मला वाईट वाटणार नाही, असे सोनल यांनी सांगितले.

माझ्या वडिलांचे नाव प्रल्हाद मोदी पाहिले आणि त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणी आहात. मी तिकिट देणाऱ्या भाजपाच्या नेत्याला म्हटले की, प्रल्हाद मोदी हे त्यांचे भाऊ आहेत, परंतू मी माझ्या कामावर तिकिट मागत आहे. मोदींनी कधी मिडीयासमोर सांगितले की ही माझी पुतणी आहे, हा भाचा आहे, असा सवाल मोदींची पुतणी सोनल मोदी (Sonal Modi) यांनी केला आहे. त्या अहमदाबादच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तिकीट मागण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना तिकीट नाकारण्यात आले. (Narendra modi's niece Sonal Modi Fails To Get BJP Ticket To Contest Ahmedabad Civic Polls)

नरेंद्र मोदी यांची पुतणी म्हणून मला तिकीट नाकारले गेले तर मला खूप दु:ख होईल, जर माझ्यापेक्षा जास्त चांगले कार्यकर्ते असतील आणि त्यांना तिकीट दिले तर मला वाईट वाटणार नाही, असे सोनल यांनी सांगितले. पक्षाने नेत्यांच्या नातेवाईकांना तिकिट दिले जाणार नाही असे जाहीर केले आहे. गुजरातमध्ये असे झाले आहे, त्याचे उत्तर प्रदेशाध्यक्षच देऊ शकतील, असे सोनल यांनी म्हणत भाजपाच्या या पक्षपातीपणावर सवाल उपस्थित केला. बीबीसीने सोनल मोदी यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मोदींसोबतचे नाते, त्यांचा होणारा फायदा याबद्दल मोठे गौप्यस्फोट केले. 

मी भाजपाची सक्रिय कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला तिकीट देण्यात यावे असे मी भाजपाच्या निवड समितीला सांगितले होते. मोदींच्या नावामुळे मी चर्चेत आले. परंतू जर तिकिट दिले असते, मी सोनल मोदी आहे हे लोकांना समजले असते. मोदींच्या नावामुळे मला कामाच्या ठिकाणीही त्रास होतो. लोक विचारतात तुम्हाला काम करायची काय गरज? असे म्हणत निघून जातात. मोदी पंतप्रधान असल्याचा फायदा कुटुंबातील कोणालाच होत नाही, आम्ही आमचे सामान्य जीवन जगतो. जेव्हा ते त्यांची आई हिराबेन यांना भेटायला जातात तेव्हा तिथे कोणी नसते. मोदी आणि हिराबेन असतात. आम्हाला तिथे येण्यास मोदींनीच मनाई केली होती. तो त्यांचा विचार असल्याचे, सोनल म्हणाल्या. 

मोदींना मी शेवटची ते मुख्यमंत्री असताना 2002 मध्ये भेटलेली. फॅमिली गेटटुगेदर होते. १० मिनिटे बोलणे झाले होते. त्यांनी आम्हाला कोणालाच पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा बोलवले नाही, याचे वाईट वाटले, असे त्या म्हणाल्या. मोदी पंतप्रधान असल्याचा मला आनंद आहे. आमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर आहे, याचा आनंद आहे, असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात