शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

जानकर यांना पुन्हा बळ मिळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 06:08 IST

बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला.

- अविनाश थोरातबारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला. मात्र, गेल्या वेळी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच दमणूक झाली. धनगर समाजाचे नेते आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी निसटत्या मतांनी विजय मिळविला. यंदाही पुन्हा सुळे- जानकर अशीच लढत होणार आहे. परंतु, जानकर यांना समाजाचे आणि पक्षाचे बळ मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.२००९ च्या निवडणुकीत सुळे देशात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन विजयी झाल्या होत्या. परंतु, २०१४ मध्ये त्यांचे मताधिक्य लाखांच्या आत आले. जानकर यांनी कपबशीऐवजी कमळ चिन्ह घेतले असते तर निकाल वेगळा लागला असता असेही बोलले जात होते. यंदाही पुन्हा जानकरच लढणार आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट होतीच. त्याचबरोबर धनगर आरक्षण, ऊसाचा प्रश्न यांनी जानकर, राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्याविरुध्द रान उठविले होते. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे. भाजपाकडून या समाजाला आरक्षणाचे आश्वासन देण्यात आले होत. सत्तेची चार वर्षे उलटून गेली तरी आरक्षण प्रत्यक्षात आले नाही. राज्याच्या मंत्रीमंडळात जानकर यांना पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रीपद मिळाले. मात्र, गेल्या चार वर्षांत त्यांनी बारामतीकडे ढुंकूनही पाहिले नाही, असा त्यांच्याच कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे २०१४ पर्यंत जानकर यांच्यासोबत असलेले अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून गेले आहेत.गेल्या वेळी बसलेल्या झटक्यामुळे मतदारांना गृहित धरता येणार नाही, याची जाणीव सुळे यांना झाली आहे. खासदारकीच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे.बारामतीतील सहा विधानसभा मतदारसंघापैकी बारामती आणि इंदापूर या दोनच ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पुरंदरमध्ये शिवसेना, दौंडमध्ये राष्टÑीय समाज पक्ष, खडकवासला-भाजपा आणि भोरमध्ये कॉँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या वेळी इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी सुळे यांना पाठिंंबा दिला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा राष्टÑवादीने पराभव केला. इंदापूरच्या जागेचा प्रश्न राहणार असल्याने पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.गेल्या वेळी जानकर यांच्याबाबत प्रचंड सहानुभूती होती. त्याला मोदी लाटेची जोड मिळाली. मतदानाच्या आकडेवारीवरून राष्टÑवादीचा बारामतीतही पराभव करता येऊ शकतो, याचा विश्वास विरोधकांना आला. यंदा अशी हवा जानकर आणि पर्यायाने भाजपाला करता आली तरच निवडणूक चुरशीची होईल.>सध्याची परिस्थितीखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील बूथ कमिटी कार्यकर्त्यांशी नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला. महादेव जानकर यांनी कपबशीच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. रासपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना तयारी सुरू करण्यास सांगितले आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जागा कॉँग्रेसला देण्याच्या बदल्यातच सुळे यांना पाठिंबा देण्याची अट हर्षवर्धन पाटील घालू शकतात. यामुळे राष्टÑवादीत अस्वस्थता आहे. धनगर समाजाचे आरक्षण हा कळीचा मुद्दा बनणार आहे. यावरून जानकर यांना घेरण्याची तयारी राष्टÑवादीने सुरू केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Supriya Suleसुप्रिया सुळेBaramatiबारामती