शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

खाकीतून खादीकडे...

By admin | Updated: February 2, 2015 00:00 IST

आयपीएसप्रमाणेच अनेक माजी आयएएस अधिका-यांनीही निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. उत्तम खोब्रागडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरपीआयमध्ये प्रवेश केला. तर विजय नहाटा यांनी शिवसेनेची वाट धरली होती.माजी आयपीएस अधिकारी पीके जैन यांनीही त्यांचा पोलिस खात्याला रामराम करत रामदास आठवले यांच्या आरपीआयमध्ये प्रवेश केला आहे.माजी पोलिस अधीक्षक संजय अपरांती यांनीही लोकसभा निवडणुकीच्या ...

आयपीएसप्रमाणेच अनेक माजी आयएएस अधिका-यांनीही निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. उत्तम खोब्रागडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरपीआयमध्ये प्रवेश केला. तर विजय नहाटा यांनी शिवसेनेची वाट धरली होती.

माजी आयपीएस अधिकारी पीके जैन यांनीही त्यांचा पोलिस खात्याला रामराम करत रामदास आठवले यांच्या आरपीआयमध्ये प्रवेश केला आहे.

माजी पोलिस अधीक्षक संजय अपरांती यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. रायगडमधून सुनील तटकरेंविरोधात त्यांनी निवडणूक लढवली खरी मात्र यात अपरांती यांचा पराभव झाला.

माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनीदेखील आम आदमी पक्षाच्या तिकीटावर बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र सुप्रिया सुळे यांच्यासमोर खोपडे अपयशी ठरले.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा देत भाजपाची वाट धरली. उत्तरप्रदेशमधील बागपत मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडूनही आले आहेत.

माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला असून भाजपाने त्यांना दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. विशेष म्हणजे बेदी यांच्यासमोर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे आव्हान असून तेदेखील भारतीय राजस्व सेवेतील माजी अधिकारी आहेत.

पोलिस खात्यातून राजकारणात जाण्याचा नवा ट्रेंड आता रुजू झाला असून चकमक फेम रवींद्र आंग्रे यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केला आहे. रविंद्र आंग्रे यांनी ५० हून अधिक एन्काऊंटर केले असून बनावट चकमक हप्तावसूलीप्रकरणी ते खात्यातून निलंबित झाले होते. मात्र कोर्टाने सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष सुटका केली होती. खाकीतून खादीकडे जाणा-या पोलिस अधिका-यांचा घेतलेला हा आढावा....