शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

कोरोनाकाळात कौतुक झालेल्या आरोग्यमंत्री शैलजा यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू, केरळच्या मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 14:55 IST

Kerala Politics News : केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले तरी केरळ सरकारने त्यांचे योग्य व्यवस्थापन केल होते. त्यामुळे केरळ सरकारचे आणि आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांचे कौतुक झाले होते.

तिरुवनंतपुरम - संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना केरळमधील सरकार कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरले होते. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले तरी केरळ सरकारने त्यांचे योग्य व्यवस्थापन केल होते. त्यामुळे केरळ सरकारचे आणि आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांचे कौतुक झाले होते. मात्र आता केरळमध्ये विधानसभा निवडणूक होऊन राज्यात पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा डाव्यांची सत्ता आली असतानाही शैलजा यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाणार नाही. यावेळी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटमध्ये भापक आणि माकपमधील नव्या चेहऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.  के.के. शैलजा ह्या निवृत्त शिक्षिका आहेत. त्यांनी केऱळमध्ये कोरोनाच्या साथीला रोखण्यामध्ये सुरुवातीच्या काळात प्रशंसनीय कार्य केले होते. तसेच राज्यात निपाह विषाणूला रोखण्यासाठीही त्यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली होती. केरळमध्ये २०१८ आणि २०१९ मध्ये निपाह विषाणूचा फैलाव झाला होता. मात्र त्याला रोखण्यात केरळ सरकार यशस्वी ठरले होते. 

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही कोरोनाकाळात के.के. शैलजा यांनी केरळमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी आखलेल्या रणनीतीची प्रशंसा केली होती. तसेच इतर राज्यांनीही त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन केले होते. 

 केरळमध्ये पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आघाडी सरकारचा शपथविधी हा २० मे रोजी होणार आहे. दुपारच्या वेळी होणाऱ्या या शपथविधीमध्ये राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे मुख्यमंत्री विजयन यांच्यासह २१ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळKerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Politicsराजकारण