शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

पंतप्रधानांना घरी पाठविण्याची वेळ आली आहे - चंद्राबाबूू नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 05:45 IST

लोकसभा निवडणुकांत भाजपाचा पराभव निश्चित असून, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरी पाठविण्याची वेळ जवळ आली आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.

अमरावती : लोकसभा निवडणुकांत भाजपाचा पराभव निश्चित असून, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरी पाठविण्याची वेळ जवळ आली आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.तेलुगू देसमच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, भाजपाला सत्तेवरून घालविण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजुटीने प्रयत्न सुरू केले आहेत. देश वाचवा, लोकशाही वाचवा या घोषणा साऱ्या देशात दुमदुमत आहेत. जनहितविरोधी राजवट मतदारांना नको आहे. भाजपाशी राजकीय शत्रुत्व पत्करणे जसे अपरिहार्य होते, तसेच लोकशाही वाचविण्यासाठी मोदींना कडाडून विरोध करणेही आवश्यक आहे. पाच राज्यांच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपाचा झालेला पराभव पुरेसा बोलका आहे.नायडू म्हणाले की, लोकसभा निवडणुकांत मोदींना हार पत्करावी लागणार असा जनमत चाचण्यांचाही निष्कर्ष आहे. आंध्र प्रदेशच्या हक्काचे १.६ लाख कोटी रुपये केंद्र सरकारने अद्यापही दिलेले नाहीत. यासंदर्भात मी पंतप्रधान मोदी यांना पत्रही लिहिले. या राज्याकडे भाजपा जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. आंध्र प्रदेशला न्याय मिळावा यासाठी १५ पक्षांनी संसदेत केंद्र सरकारला प्रश्न विचारून धारेवर धरले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडू