शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

नाशकात गुन्हेगारी वाढत असेल तर गुंतवणूक येणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2023 01:09 IST

दावोसला मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे शिष्टमंडळ गेले होते आणि कोट्यवधींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. यात नाशिकच्या पदरी भोपळा पडला. राजकीय आरोप-प्रत्यारोपापेक्षा आपण नाशिककरांनी गुंतवणूकदार नाशिकमध्ये का येत नाही, याचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. २१ लाखांच्या या शहराला निसर्गाने भरभरून दिले आहे. हवामान आल्हाददायक आहे.

ठळक मुद्देपोलिस स्टेशनबाहेर फटाके फोडले जाताततब्बल ८ तास शेतकरी मालेगावात ठिय्या मांडूनराजकीय व शासकीय मंडळींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता

बेरीज वजाबाकी

मिलिंद कुलकर्णी

दावोसला मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे शिष्टमंडळ गेले होते आणि कोट्यवधींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. यात नाशिकच्या पदरी भोपळा पडला. राजकीय आरोप-प्रत्यारोपापेक्षा आपण नाशिककरांनी गुंतवणूकदार नाशिकमध्ये का येत नाही, याचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. २१ लाखांच्या या शहराला निसर्गाने भरभरून दिले आहे. हवामान आल्हाददायक आहे. सुवर्ण त्रिकोणात शहर आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवत आणि पायाभूत सुविधांचा विचार न करता ज्या गती आणि पद्धतीने विकास केला जात आहे, तो पुढे गंभीर विषय बनणार आहे. अपघात, प्रदूषण या दोन्ही बाबींमध्ये नाशिकचे नाव अग्रक्रमावर आहे. गुन्हेगारीवर कुणाचा अंकुश आहे की, नाही असे वाटावे एवढी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. विधिमंडळात एका पोलिस निरीक्षकाविरोधात चर्चा होते, महिन्यानंतर त्यांची चौकशी सुरू होते, बदली होते आणि पोलिस स्टेशनबाहेर फटाके फोडले जातात, हे चित्र काय दर्शवते? पोलिस दलातील अनागोंदी तर नव्हे ना?बळीराजाच्या शक्तीचे दर्शन

जिल्हा बँकेच्या शेतकरी विरोधी कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी काढण्यात आलेल्या बिऱ्हाड मोर्चातून बळिराजाच्या शक्तीचे दर्शन घडले. शरद जोशी यांची शेतकरी संघटना, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह इतर शेतकरी संघटनांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांची बँक असलेली जिल्हा बँक आता शेतकऱ्यांचे हित साधण्यापेक्षा शेतकऱ्यांचे तथाकथित नेते असलेल्या राजकीय मंडळींना सांभाळण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. या मोर्चातून तो दिसून आला. तब्बल ८ तास शेतकरी मालेगावात ठिय्या मांडून बसले होते. शासनाचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री दादा भुसे यांनी संवेदनशीलता दाखवित मोर्चापूर्वी आदल्या रात्री आणि मोर्चातही शेतकरी नेत्यांशी चर्चा केली. सहकारमंत्र्यांशी चर्चा करीत काही आश्वासने मिळविली. मुद्दल कर्जाच्या रकमेवर सहा ते आठ टक्के व्याज आकारणी करून भरपाई देण्यास मुदतवाढ देऊ, सक्तीची कर्जवसुली थांबवू, अशी आश्वासने पदरी पडली. ही पाळली न गेल्यास १६ फेब्रुवारीला शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकणार आहेत.आधी लॉजिस्टिक पार्क करा, नंतर श्रेय घ्या

निफाड साखर कारखान्याच्या अतिरिक्त जागेवर ड्रायपोर्ट होणार होता, तो का झाला नाही, याचा मोठा इतिहास आहे. त्या वादात न पडता ताजा विषय म्हणजे ड्रायपोर्टऐवजी आता मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क होणार आहे. त्याची पाहणी करण्यासाठी नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंटचे सीईओ प्रकाश गौर आणि त्यांचे पथक येऊन गेले. त्यांनी जागेची पाहणी केली. लगतच्या सुकेणे रेल्वे स्टेशनला भेट दिली. अवघ्या ८ कि.मी. अंतरावर असलेल्या महामार्गावरदेखील ते जाऊन आले. ११० एकर जागेत उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाला रस्ते, रेल्वे आणि हवाईमार्गे जोडण्यासाठी आता सुधारित डीपीआर केला जाणार असल्याची माहिती या पथकाने दिली. या प्रकल्पासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या पाठपुरावा करीत आहे. मात्र त्या दक्षिण भारतात दौऱ्यावर असताना हे पथक आले आणि खासदार हेमंत गोडसे यांनी पथकासोबत जात पाहणी केली. त्यावरून श्रेयाच्या चर्चा रंगल्या. निफाड मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर यांनी या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नांची जंत्री सादर केली.आदर्श आचारसंहितेची व्यवहार्यता तपासा

राज्यातील पाच ठिकाणी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका सुरू आहेत. सर्वच महसूल विभागात त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू आहे. पाच जिल्ह्यांमध्ये कोणत्याही नवीन विकासकामांना मंजुरी मिळणार नाही, निविदा, कार्यादेश निघणार नाही, प्रारंभ होणार नाही, असे या आचारसंहितेचे स्वरूप आहे. मुळात शिक्षक व पदवीधर मतदारसंघांसाठी ही निवडणूक असल्याने दोन लाखांपर्यंत मतदारांशी या निवडणुकीचा संबंध आहे. सर्वसामान्य मतदारांना या निवडणुकीचे सोयरसुतक नाही; पण आचारसंहिता संपूर्ण पाच जिल्ह्यांमध्ये लागू आहे. आधीच कोरोनामुळे दोन वर्षे विकासकामे ठप्प होती. यापुढे पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नंतर लोकसभा व विधानसभा निवडणुका येतील. म्हणजे सर्वकाळ आचारसंहिता राहील, अशीच चिन्हे आहेत. शेषन यांच्यासारख्या निवडणूक आयुक्तांची अशा वेळी आठवण येते. नियमांची व्यवहार्यता तर तपासायला काय हरकत आहे?वादाला आले नळावरच्या भांडणाचे स्वरूप

देवळालीच्या आमदार सरोज आहेर आणि तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्याला अक्षरश: नळावरील भांडणाचे स्वरूप आले आहे. तहसीलदार राजश्री अहिरराव व त्यांच्या भगिनी जलसंपदा विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता अलका अहिरराव या दोघांविषयी आमदार सरोज आहेर यांचा आक्षेप आहे. देवळाली मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी तहसीलदार राजश्री अहिरराव या इच्छुक असून त्या शासकीय पदाचा उपयोग करीत मतदारसंघात जनसंपर्क अभियान राबवितात, तर भगिनी अलका अहिरराव या आमदारांच्या विकासकामांमध्ये खोडा घालण्याचे काम करीत असल्याचा आमदार सरोज आहेर यांचा आक्षेप आहे. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात तसेच पत्रकार परिषदांच्या माध्यमातून त्यांनी अहिरराव भगिनींवर जाहीर आरोप केले आहेत. अहिरराव भगिनींनी त्या आरोपांना उत्तर दिले नसले तरी राजश्री अहिरराव या समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करीत भूमिका मांडत आहेत. हे भांडण थांबविण्यासाठी राजकीय व शासकीय मंडळींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक