शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मला निवडणूक लढविण्यास कायद्याने मज्जाव नाही - साध्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 05:56 IST

मी आरोपी असले तरी मलाही निवडणूक लढण्यास मनाई करता येणार नाही, अशी भूमिका भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या वादग्रस्त उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी येथील विशेष न्यायालयात मांडली.

मुंबई : फौजदारी खटल्यात आरोपी असलेल्या व्यक्तीने निवडणूक लढण्यास कायद्याने मज्जाव नाही. त्यामुळे मी आरोपी असले तरी मलाही निवडणूक लढण्यास मनाई करता येणार नाही, अशी भूमिका भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या वादग्रस्त उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी येथील विशेष न्यायालयात मांडली.विशेष ‘एनआयए’ न्यायालयाचे न्यायाधीश विनोद पडाळकर यांच्यापुढे सध्या या बॉम्बस्फोटांत जखमींच्या साक्षी नोंदविणे सुरू आहे.साध्वींना जामीन मंजूर करताना खटल्यास रोज हजर राहण्याची अट घालण्यात आली आहे. आपण खूप आजारी आहोत व कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय आपल्याला चालताही येत नाही, असे सांगून जामीन मिळविणाऱ्या साध्वी रणरणत्या उन्हात निवडणुकीचा प्रचार करत फिरायला मात्र तंदुरुस्त आहेत. शिवाय त्यांचा जामीन रद्द करण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे साध्वींना निवडणूक प्रचार न करता न्यायालयात हजर राहण्यास सांगावे, असा अर्ज या बॉम्बस्फोटांमध्ये मृत्यू पावलेल्या सय्यद अजहर या तरुणाचे वडील निस्सार अहमद सय्यद बिलाल यांनी केला आहे.याला उत्तर देताना साध्वी प्रज्ञासिंह यांनी या अर्जात काही दम नसल्याने तो फेटाळावा, अशी मागणी केली. त्यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार फौजदारी खटल्यात दोषी ठरून ज्यांना शिक्षा झाली आहे, अशा व्यक्तींनाच निवडणूक लढविण्यास मज्जाव आहे. प्रलंबित खटल्यातील आरोपींना बंदी नाही. त्यामुळे मीही केवळ आरोपी असल्याने मलाही निवडणूक लढविण्यापासून रोखता येणार नाही.हा विषय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील असल्याने बिलाल यांच्या या अर्जावर आपल्याला काहीही म्हणणे मांडायचे नाही, असे या खटल्याचा अभियोग चालविणाºया राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हटले.‘शिक्षा झाली नसल्याने निवडणुकीस पात्र’लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार फौजदारी खटल्यात दोषी ठरून ज्यांना शिक्षा झाली आहे, अशा व्यक्तींनाच निवडणूक लढविण्यास मज्जाव आहे. प्रलंबित खटल्यातील आरोपींना बंदी नाही. त्यामुळे मीही केवळ आरोपी असल्याने मलाही निवडणूक लढविण्यापासून रोखता येणार नाही, असा युक्तीवाद साध्वी यांनी न्यायालयासमोर केला

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर