शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत आल्यास गृहिणींना पगार देणार; कमल हासन यांची मोठी घोषणा

By कुणाल गवाणकर | Updated: January 5, 2021 19:05 IST

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी कमल हासन यांच्या एमएनएम पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध

नवी दिल्ली: चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर मक्कल निधी मय्यम (एमएनएम) पक्षाची स्थापना करणाऱ्या कमल हासन यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठी घोषणा केली आहे. कमल हासन यांच्या पक्षाचा जाहीरनामा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सत्तेत आल्यास गृहिणींना दर महिन्याला पगार देऊ, अशी घोषणा हासन यांनी केली आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी हासन यांनी केलेल्या घोषणेचं कौतुक केलं आहे.तमिळनाडू विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यासाठी कमल हासन यांनी प्रचार सुरू केला आहे. पक्ष सत्तेत आल्यास कोणकोणत्या योजना राबवल्या जातील, याची माहिती देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. सत्तेत आल्यास गृहिणींना पगार देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. 'शिक्षण, रोजगार आणि उद्योगांच्या माध्यमातून महिलांना प्राधान्य देण्यात येईल. गृहिणींकडे अनेकदा समाजाचं दुर्लक्ष होतं. त्यांच्या कामाला महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे पक्ष त्यांना मासिक वेतन देईल. त्यामुळे महिलांची प्रतिष्ठा वाढेल. यासाठी पक्ष सुशासन आणि आर्थिक विषयांसंदर्भात सात कलमी कार्यक्रम राबवेल,' असं कमल हासन म्हणाले. काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी कमल हासन यांनी केलेल्या घोषणेचं कौतुक केलं आहे. गृहिणींना मासिक वेतन मिळाल्यास त्यांना ओळख मिळेल, असं थरुर म्हणाले. आपल्या पक्षाचा अजेंडा जनतेसमोर ठेवताना कमल हासन यांनी द्रमुक आणि अण्णाद्रमुकवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 'भ्रष्टाचारात बरबटलेले लोक जनतेला नको आहेत. जनतेला त्यांच्यापासून सुटका हवी आहे. आमच्या पक्षाला जनतेकडून खूप प्रेम मिळत आहे. जनतेला भ्रष्ट मंडळी नकोत, तर बदल हवा आहे, हेच यातून दिसतं,' असं हासन यावेळी म्हणाले.

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनShashi Tharoorशशी थरूर