शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

"पिझ्झा, बर्गरची होम डिलिव्हरी चालते, मग रेशनची का नको?" केजरीवालांचा मोदींना बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 14:17 IST

Delhi Politics News: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये घरपोच रेशन योजना सुरू करण्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला वाद वाढत आहे.

नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये घरपोच रेशन योजना सुरू करण्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला वाद वाढत आहे. यादरम्यान अरविंद केजरीवार यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. दिल्लीमध्ये पुढील आठवड्यापासून घरपोच रेशन पुरवण्याचे काम सुरू झाले असते. सर्व तयारी झाली होती. मात्र अचानक केंद्र सरकारने यासाठी परवानगी घेतली नसल्याचे सांगत परवानगी नाकारली, ही बाब चुकीची आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. याशिवाय अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, आम्ही एकवेळ नाही तर पाच वेळा केंद्राची परवानगी घेतली आहे. कायदेशीररीत्या अशा परवानगीची आवश्यकता नाही. रेशनची होम डिलिव्हरी होण्यात गैर काय आहे. तुम्ही रेशन माफियांसोबत उभे राहणार असाल तर मग गरिबांसोबत कोण उभं राहील. त्या ७० लाख गरिबांचे काय होईल. ज्यांचे रेशन हे रेशन माफिया चोरून नेतात. अरविंद केजरीवाल म्हणाले की, या देशात जर स्मार्टफोन, पिझ्झाची होम डिलिव्हरी होऊ शकते. मग रेशनची का नाही. पंतप्रधान मोदीजी तुम्हाला रेशन माफियांबाबत एवढी सहानुभूती का आहे. त्या गरीबांची हाक कोण ऐकणार, केंद्राने कोर्टात आमच्या योजनेविरोधात आक्षेप घेतला नाही. मग आता ती योजना का फेटाळली जात आहे. अनेक गरीबांची नोकरी गेली आहे. लोक बाहेर पडू इच्छित नाहीत. त्यामुळे आम्ही घरपोच रेशन पुरवण्याचा विचार करत आहोत.  केंद्र सरकारकडून या क्रांतिकारी रेशन वाटप योजनेला रोखण्यात येत असल्याचा आरोप दिल्ली सरकारकडून करण्यात येत आहे. केंद्राने या योजनेला अद्याप मंजुरी दिलेली नाही. तसेच कोर्टामध्ये या योजनेच्याविरोधात एक खटला सुरू आहे, असे कारण देत नायब राज्यपालांनी या योजनेची सुरुवात करण्याची फाइल फेटाळली आहे, असा आरोप दिल्ली सरकारने केला आहे.  घरपोच रेशन पुरवाठा योजनेवरून आधीही वाद झालेला आहे. ही योजना केंद्र सरकारच्या नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्ट अंतर्गत येते. यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा केवळ संसदेच्या माध्यमातून होऊ शकतो. राज्य सरकारकडून त्यात बदल करता येत नाही. त्यामुळे दिल्ली सरकार या योजनेचे नाव बदलू शकत नाही. तसेच या योजनेला कुठल्याही अन्य योजनेशी जोडता येणार नाही, अशा शब्दात केंद्राने आक्षेप घेतला होता.  

टॅग्स :delhiदिल्लीPoliticsराजकारणArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी