शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

छे छे छे, खुर्चीसाठी भांडायचं नाही; बाळासाहेबांच्याच व्हिडीओद्वारे देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा

By बाळकृष्ण परब | Updated: January 23, 2021 18:12 IST

Devendra Fadnavis News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या गाजलेल्या भाषणांमधील काही विधानांचा समावेश करून शिवसेनेला चिमटा काढला आहे.

ठळक मुद्देअलीकडच्या राजकारणामध्ये आपण बघतो. खूप वेळा नेत्यांची मनं छोटी छोटी होतातते आपल्यापलीकडे पाहू शकत नाहीतपण बाळासाहेबांच मन राजासारखं होतं. जे चैतन्य बाळासाहेब तयार करायचे ते मात्र अप्रतिम असायचं

मुंबई - शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त आज सकाळपासूनच राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रांमधून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली जात आहे. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. तसेच ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या गाजलेल्या भाषणांमधील काही विधानांचा समावेश करून शिवसेनेला चिमटा काढला आहे.बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अलीकडच्या राजकारणामध्ये आपण बघतो. खूप वेळा नेत्यांची मनं छोटी छोटी होतात. ते आपल्यापलीकडे पाहू शकत नाहीत. पण बाळासाहेबांच मन राजासारखं होतं. जे चैतन्य बाळासाहेब तयार करायचे ते मात्र अप्रतिम असायचं. म्हणजे निवडणुका हरो का जिंको. बाळासाहेब येऊन गेल्यानंतर जिंकल्याची मजा यायची.या ट्वीटच्या पुढच्या भागात बाळासाहेबांच्या भाषणातील काही उद्गार समाविष्ट केले आहेत. ह्यह्णमी फालतू लोकशाही मानत नाही. ही लोकशाही नव्हे. ज्या जनतेनं विश्वासानं निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता. पैशाकरता. भांडण काय तुमचं. खुर्चीवरचं. छे छे खुर्चीसाठी भांडायचं नाही. पैशासाठी लाचार व्हाल तर भगवा झेंडा हातात ठेऊ नका. हे दोष तुमच्या मराठ्यांच्या रक्तात असता कामा नये याची काळजी घ्या, असे आवाहन या व्हिडीओमध्ये बाळासाहेब करताना दिसत आहेत. बाळासाहेबांचे हे उद्गार ट्वीटमध्ये समाविष्ट करून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदावरून युती तोडण्याचा निर्णय घेणाऱ्या शिवसेनेला टोला लगावला आहे.तुमचं तेज तुम्हाला कायम ठेवता आलं पाहिजे. त्या तेजाला मग कुणी हात लावू शकणार नाही. तुटलात तर संपलात. आदरानं लोकं पाहताहेत तो आदर तसाच ठेवा, असे आवाहन करणारी चित्रफीतही देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडीओत समाविष्ट केली आहे.

 

 

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPoliticsराजकारण