शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Gangrape : हाथरसमधील पीडित कुटुंबाचे सांत्वन करताना प्रियंका गांधींना अश्रू झाले अनावर

By बाळकृष्ण परब | Updated: October 3, 2020 20:16 IST

Hathras Gangrape case News : राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा हाथरस येथे जात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

हाथरस (उत्तर प्रदेश) - सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या आणि नंतर उपचारादम्यान मृत्यू झालेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबाची काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भेट घेतल. यापूर्वी भेट घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी राहुल आणि प्रियंका यांना अटकाव करत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा हाथरस येथे जात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. तर या कुटुंबाचे सांत्वन करताना प्रियंका गांधी यांच्याही भावनांना बांध फुटला.गेल्या दोन दिवसांपासून हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान पीडित कुटुंबाची भेट घेण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, असे राहुल यांनी म्हटले होते. यानंतर दोघेही हाथरससाठी रवाना झाले असून प्रियंका गांधी स्वत: गाडी चालवत आहे. तर राहुल गांधी त्यांच्या बाजूच्या सीटवर बसल्याचे दिसून आले होते.

ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले ती आमची मुलगी नाही, पीडितेच्या कुटुंबीयांचा खळबळजनक दावा  उत्तर प्रदेशातल्याहाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणावरून उत्तर पोलिसांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्व गावात येणारे रस्ते पोलिसांनी सील करून नाकेबंदी केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी अखेर मीडियाला गावात जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यावेळी पत्रकारांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतले, त्यावेळी कुटुंबाने खळबळजनक आरोप केला की, पोलिसांनी ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत ती आमची मुलगी नव्हती. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पीडित कुंटुंबाला पीडित मृत मुलीचा चेहरा न दाखवताच परस्पर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. यामुळेच आणखी या घटनेबाबत देशात संताप निर्माण झाला. 

 

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश