शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

गटबाजी, नाराजीच्या लाटेत फसली भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 05:44 IST

सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाला नुकत्याच झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकांत अवघ्या १५ जागांवरच समाधान मानावे लागले.

- साहेबराव नरसाळेसलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाला नुकत्याच झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकांत अवघ्या १५ जागांवरच समाधान मानावे लागले. या पराभवाची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांवर ढकलल्याने भाजपात गटबाजी उफाळली आहे़ हे वादळ शमले नसतानाच पराभूत नेत्यांवरच भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविल्याने आता ही ‘भारतीय पराभूत पार्टी’ झाली, अशी टीका नाराज करु लागले आहेत़आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व ११ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे़ या मतदारसंघांची विभागणी रायपूर, बस्तर, बिलासपूर या तीन विभागांमध्ये केली जाते. त्यासाठी भाजपाने प्रभारी नियुक्त केले आहेत़ रायपूर विभागाचे प्रभारी म्हणून माजी मंत्री राजेश मुनोत, बस्तर विभागाचे प्रभारी म्हणून माजी मंत्री केदारनाथ कश्यप, बिलासपूर विभागाचे प्रभारी म्हणून माजी मंत्री अमर अग्रवाल यांची नियुक्ती केली आहे़ हे तीनही प्रभारी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत़भाजपाने प्रदेशाध्यक्ष धरमलाल कौशिक यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्याने तिथे नाराजी आहे़ कौशिक यांची एकतर्फी निवड केल्याने काही आमदार नाराज आहेत. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवनारायण द्विवेदी यांनी राजीनामा दिला असून, ते काँगे्रसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत़काँगे्रसमधून बाहेर पडून जनता काँगे्रस पक्ष स्थापन केलेल्या अजित जोगी यांनाही बंडखोरांनी ग्रासले आहे़ जनता काँगे्रसचे वरिष्ठ नेते अब्दुल हमीद हयात व बृजेश साहू यांची बंडखोरीमुळे हकालपट्टी करण्यात आली़ याच पक्षाचे सियाराम कौशिक, चंद्रभान बारमते, चैतराम साहू, संतोष कौशिक हे नेते काँगे्रसच्या संपर्कात आहेत. ते २८ जानेवारी रोजी काँगे्रसमध्ये प्रवेश करतील, या शक्यतेला काँगे्रसचे प्रभारी पी़ एल़ पुनिया यांनी दुजोरा दिला आहे़लोकसभेच्या तयारीसाठी काँगे्रसच्या बैठका सुरु आहेत. पण विधानसभेतील विजयामुळे काँगे्रसमध्येही गटबाजी आहे़ ‘प्रत्येक पक्षात बंडखोरी असतेच’, असे सांगत आरोग्यमंत्री टी़ एस़ सिंहदेव यांनी ही समस्या आमच्याकडे असल्याचे मान्य केले. मात्र काँग्रेसमधील कोणीही नेता बंडखोरी करणार नाही, असा दावा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला.>एकाच जागेच्या विजयाचा इतिहास पुसणार?मध्यप्रदेशचे विभाजन करून नोव्हेंबर २००० मध्ये छत्तीसगडची निर्मिती करण्यात आली़ त्यानंतर काँगे्रसचे अजित जोगी हे पहिले मुख्यमंत्री झाले़ पण २००३ सालच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत भाजपने ५० जागा जिंकून काँगे्रसला धूळ चारली़मुख्यमंत्री झालेल्या रमण सिंह यांनी छत्तीसगडमध्ये निर्विवाद वर्चस्व राखले़ महासमुंदमधून २००४ च्या लोकसभा निवडणुकीत महासमुंद अजित जोगी हे एकमेव काँगे्रस उमेदवार निवडून आले, तर २००९ साली लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला पुन्हा एकाच जागेवर रोखले़दुर्गमधून २०१४ साली दुर्ग काँगे्रसचे ताम्रध्वज साहू हे एकटेच विजयी झाले़ म्हणजेच तीन लोकसभा निवडणुकांत काँगे्रस एका जागेवरून पुढे सरकली नाही. या एका जागेचा इतिहास पुसण्याचे आव्हान काँगे्रसपुढे आहे़>जनता काँगे्रस व बसपाची युतीलोकसभेसाठी अजित जोगी यांची जनता काँगे्रस व बसपाची युती आहे़ जनता काँगे्रसला ७ व बसपाला ४ जागा असा फॉर्म्युला ठरला आहे़ याची माहिती जनता काँगे्रसने दिली़ मात्र, बसपाने त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Chhattisgarhछत्तीसगड